शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चेक, गॅसची किंमत, बँकिंग… १ ऑगस्टपासून बदलणार हे नियम, तुमच्यावर काय होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 2:57 PM

1 / 8
काही दिवसांतच आता ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. १ ऑगस्टपासून रोख व्यवहारांशी संबंधित नियम बदलणार आहेत. एलपीजी सिलिंडरच्या (एलपीजी) किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केल्या जातात.
2 / 8
१ ऑगस्टपासून बँक ऑफ बडोदा (BOB) चेकशी संबंधित नियम बदलणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये पॉझिटिव्ह पे सिस्टम सुरू होणार आहे. तसेच ऑगस्टमध्ये अनेक सणांच्या सुट्ट्या आल्याने या महिन्यात बँकाही अधिक दिवस बंद राहणार आहेत.
3 / 8
बँक ऑफ बडोदा (BOB) चे चेक पेमेंटचे नियम १ ऑगस्टपासून बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, बँक ऑफ बडोदाने चेक पेमेंटचे नियम बदलले आहेत. बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना कळवले आहे की १ ऑगस्टपासून ५ लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू करण्यात आली आहे.
4 / 8
याअंतर्गत चेक जारी करणाऱ्याला चेकशी संबंधित माहिती एसएमएस, नेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे बँकेला द्यावी लागेल. त्यानंतरच चेक क्लिअर होईल. जर कोणताही चेक जारी करायचा असेल तर त्याचा क्रमांक, देयकाची रक्कम आणि प्राप्तकर्त्याचे नाव यासह अनेक तपशील बँकेला प्रदान करावे लागतील.
5 / 8
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सिलिंडरच्या किमती निश्चित होत असतात. १ ऑगस्ट रोजी सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या गॅस सिलिंडरचा दर निश्चित करतील. गेल्या वेळी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ पाहायला मिळाली होती.
6 / 8
फसवणुकीला आळा घालण्यासाठी २०२० मध्ये चेक पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टमची सुरूवात करण्यात आली होती. याच्या द्वारे ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीच्या चेकसाठी काही महत्त्वाची माहिती द्यावी लागते.
7 / 8
ऑगस्ट महिन्यात एकूण १८ दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑगस्टमध्ये आपल्या यादीत अनेक दिवस बँक बंद असल्याची माहिती दिली आहे. ऑगस्टमध्ये मोहरम, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी असे अनेक सण आहेत. ज्या दिवशी बँकांचं कामकाज चालणार नाही.
8 / 8
याशिवाय दुसरा, चौथा शनिवार आणि रविवारी आठवड्याची सुट्टी असल्याने बँकांचं कामकाज बंद राहिल. एकूण सुट्ट्यांचे दिवस पाहिले तर ऑगस्ट महिन्यात एकूण १८ दिवस बँका बंद राहतील.
टॅग्स :bankबँकCylinderगॅस सिलेंडरIndiaभारत