शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बँकेने फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिला, लगेच करा हे काम; RBI चे नियम जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2023 5:27 PM

1 / 9
जर आपल्याकडे खराब झालेल्या किंवा फाटलेल्या नोटा असतील तर त्या नोटा बदलून देण्याची सोय बँकेत असते, पण अनेकांना या संदर्भात माहिती नसते.
2 / 9
अनेकजण या नोटा बँकेत जमा करत नाहीत. त्यामुळे आपल्याला नुकसान सहन करावे लागत असते. तर अनेकांना बदलून घेण्याची माहिती नसल्यामुळे तोटा सहन करावा लागतो.
3 / 9
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ग्राहकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर नोटा बदलून न दिल्याची तक्रार केली आहे. बँकेच्या शाखेने ५०० ची नोट बदलून देण्यास नकार दिला. ग्राहकाने एसबीआय आणि आरबीआयला यावर काय करू शकतो, असा प्रश्न केला आहे.
4 / 9
ग्राहकाच्या या तक्रारीला एसआयबीआय उत्तर दिले आहे. SBI ने म्हटले आहे की, SBI पोर्टलवर किंवा https://crcf.sbi.co.in/ccf या थेट लिंकवर जाऊन त्या शाखेची तक्रार करता येईल. तक्रारीनंतर बँकेच्या शाखेत कारवाई केली जाईल.
5 / 9
जर तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खराब असेल तर आणि बँकेने त्या स्वीकारण्यास नकार दिला असेल तर तुम्हाला काही प्रोसेस करावी लागणार आहे.
6 / 9
२ जुलै २०१८ रोजी आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विकृत, मृदू आणि दोन तुकड्यांमध्ये चिकटवलेल्या नोटा बदलण्याची परवानगी आहे.
7 / 9
आरबीआयने परिपत्रकात म्हटले होते की, कोणत्याही प्रकारच्या फाटलेल्या नोटा बँकांनी बदलून त्याऐवजी नवीन नोटा जारी कराव्यात. स्मॉल फायनान्स बँका त्यांच्या पर्यायानुसार फाटलेल्या आणि सदोष नोटा बदलून देऊ शकतात, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.
8 / 9
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, अशा खराब नोटा बँक काउंटरवर सरकारी देय रक्कम भरण्यासाठी आणि बँकांमध्ये असलेल्या सार्वजनिक खात्यांमध्ये जमा करण्यासाठी स्वीकारल्या जाव्यात.
9 / 9
आरबीआयच्या परिपत्रकानुसार, फाटलेल्या नोटा म्हणजे त्या नोटा ज्यामध्ये एक भाग गहाळ आहे किंवा ज्या दोन तुकड्यांपेक्षा जास्त बनलेल्या आहेत. या नोटा कोणत्याही बँकेच्या शाखेत जमा करता येतात.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँक