शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bank Timing Alert: आजपासून बँकांच्या वेळांमध्ये मोठा बदल! आरबीआयचे आदेश, एक तासाचा फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 5:33 PM

1 / 7
बँकांच्या वेळेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आरबीआयने सोमवारपासून बँका उघडण्याच्या वेळेत बदल केला आहे. यामुळे ग्राहकांची मोठी सोय होणार असून आणखी एक तास अधिक बँका उघड्या मिळणार आहेत.
2 / 7
रिझर्व्ह बँकेने १८ एप्रिल, २०२२ पासून बँका उघडण्याच्या वेळेत बदल केला आहे. यापुढे बँका ९ वाजता उघडणार आहेत. कोरोना महामारीमुळे रिझर्व्ह बँकेने उघडण्याची ही वेळ कमी केली होती. आता पुन्हा ही वेळ नियमित केली जात आहे.
3 / 7
आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळा देखील बदलल्या आहेत. यामध्ये कॉल मनी, गवर्मेंट पेपर्स, गवर्मेंट सिक्योरिटीज, रेपो इन कॉर्पोरेट बॉन्ड्स व रूपी इंटरस्ट रेट डेरिवेटिव या बाजारांचा समावेश आहे. याशिवाय अन्य बाजार देखील आजपासून १० ऐवजी सकाळी ९ वाजता उघडणार आहेत.
4 / 7
आरबीआयने सर्व बँकांना कार्डलेस एटीएम व्यवहाराची सुविधा लवकरच सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना लवकरच UPI द्वारे बँक आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे.
5 / 7
कार्डलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय हे पाऊल उचलत आहे. यासाठी सर्व बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा UPI द्वारे दिली जाईल.
6 / 7
कार्डलेस कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये एटीएम पिनऐवजी मोबाइल पिन वापरला जाईल, ज्यामुळे एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
7 / 7
कार्डलेस ट्रान्झॅक्शनमुळे व्यवहार सोपे होतील आणि कार्डलेस ट्रान्झॅक्शनमुळे कार्ड क्लोनिंग, कार्ड चोरी आणि इतर अनेक प्रकारची फसवणूक टाळता येईल. एसबीआय सारख्या काही बँका आधीपासूनच अशाप्रकारची सेवा देत आहे.
टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र