शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Banking : चेकवर रक्कम टाकल्यानंतर Only का लिहिलं जातं? दैनंदिन व्यवहार करणाऱ्यांनाही नाही ठावूक, असं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 9:29 AM

1 / 6
बँकिंग व्यवहारांमध्ये तुम्हीही बहुतांश वेळा चेकचा वापर केला असेलच. मात्र या चेकबाबतच्या काही गोष्टी क्वचितच तुम्हाला माहिती असतील. आज आम्ही तुम्हाला चेकबाबतच्या अशाच काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील. या गोष्टी तुम्हाला संभाव्य फसवणूक आणि नुकसानापासून वाचवू शकतात. त्यामुळे कधीही चेक काढताना या गोष्टींची काळजी अवश्य घ्या.
2 / 6
व्यापारी किंवा वैयक्तिक देवाणघेवाणीसाठी नेहमी चेक काढले जातात. जर तुम्ही कुठल्याही व्यक्तीला चेकने रक्कम देत असाल तर त्यासंबंधीच्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे.
3 / 6
तुम्ही पाहिलं असेल की, अनेकदा जेव्हा कुठली मोठी संस्था किंवा व्यापारी चेक काढतात. तेव्हा रकमेनंतर Only हा शब्द लिहितात. पण हा शब्द का लिहिला जातो, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का.
4 / 6
त्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे रकमेच्या शेवटी Only लिहिण्याचा हेतू संभाव्य फसवणुकीला रोखणे हा आहे. त्यासाठी रक्कम शब्दांमध्ये लिहिल्यानंतर शेवटी Only लिहिलं जातं.
5 / 6
समजा तुम्ही चेक काढताना त्यावर २५,००० ही रक्कम शब्दांमध्ये लिहिली आणि शेवटी Only लिहिलं नाही, तर त्या स्थितीमध्ये अन्य कुणी व्यक्ती त्यापुढे अजून काही रक्कम नोंदवून अमाउंट वाढवू शकते.
6 / 6
त्यामुळे तुम्ही फसवणुकीची शिकार होऊ शकता. त्यामुळे चेक जारी करताना रकमेच्या शेवटी Only लिहिलं जातं. तर आकड्यांमध्ये रक्कम नोंद केल्यानंतर /- हे चिन्ह वापरलं जातं.
टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्रMONEYपैसा