banks fixed deposit what are the disadvantages keep an eye on these things investment tips
FD मध्ये जराशी चूक आणि होऊ शकतं नुकसान; बॅंकाही सांगत नाहीत, या गोष्टींकडे ठेवा लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 9:41 AM1 / 8सध्या गुंतवणूकीचे अनेक पर्याय उपलब्ध असले तर फिक्स्ड डिपॉझिट्सना आजही ग्राहकांकडून पसंती मिळतेय. यामध्ये मॅच्युरिटीनंतर तुम्हाला निश्चित परतावा मिळतो. यामध्ये तुम्हाला चांगलं व्याजही मिळतं.2 / 8पण काही गुंतवणूक सल्लागार मानतात की त्यालाही काही मर्यादा आहेत. यामध्ये जर ती बँक डिफॉल्ट झाली तर तुमचे पैसे बुडण्याचा धोका असतो. 3 / 8तर दुसरीकडे मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे गुंतवणूकदारानं त्याबद्दल समजून घेणे आणि जाणून घेणं आवश्यक आहे. एफडीमधील होणाऱ्या या नुकसानीबद्दल जाणून घेऊ.4 / 8जर तुम्हाला गरजेच्या वेळी पैसे काढायचे असतील तर तुम्हाला एफडी मोडता येणार नाही. पण तुम्ही ती मोडली तर बँक तुम्हाला व्याज देणार नाही आणि दंडही भरावा लागेल. एफडी करताना दंडाची रक्कम अटींमध्ये लिहिली जाऊ शकते. प्रत्येक बँकेसाठी ते वेगळे असू शकते.5 / 8अनेकदा बँक बुडण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराच्या ठेवीवरील जोखीम वाढते. नवीन नियमानुसार, बँक बुडल्यास एकूण ठेवीवर ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. 6 / 8अशा परिस्थितीत, जर तुम्ही बँकेत १५ लाख रुपयांची एफडी केली असेल आणि ती बँक बुडली तर तुम्हाला फक्त ५ लाख रुपयांपर्यंतच मिळणार आहे. उर्वरित १० लाख रुपये बुडण्याचा धोका आहे.7 / 8यामध्ये बाजारात झालेल्या नफ्याचा कोणताही फायदा होणार नाही. कारण यामध्ये व्याजदर स्थिर राहतो. जर महागाईचा दर ६ टक्के झाला आणि तुम्हाला मिळणारं व्याज फक्त ५ ते ६ टक्के असेल, तर या परिस्थितीत तुम्हाला फक्त निगेटिव्ह रिटर्न मिळेल.8 / 8फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याचा पहिला तोटा म्हणजे व्याजदर निश्चित असतो. म्हणजेच बँकेनं तुम्हाला दिलेलं व्याज स्थिर राहते. स्टॉक किंवा म्युच्युअल फंड यांसारख्या इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये तुम्हाला मिळणारे व्याज एफडीपेक्षा खूप जास्त आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications