शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shopping Bank Offers : सणासुदीच्या खरेदीसाठी बँकांनी दिली मोठी ॲाफर; मिळतोय भरघोस डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 9:59 AM

1 / 7
सणासुदीला सुरुवात झाली असून, ग्राहकांना खरेदीकडे वळवण्यासाठी ई-कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम क्षेत्रातील कंपन्या आणि बँका डिस्काउंट, कॅशबॅकसोबतच अनेक ॲाफर्स देत आहेत. त्यामुळे खरेदीची मोठी संधी निर्माण झाली आहे.
2 / 7
आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी आणि पीएनबीसह अनेक बँकांनी गृह कर्ज, वाहन कर्जाचे व्याजदर घटवण्यासह ईएमआयवर सवलत आणि प्रोसेसिंग शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे. क्रेडिट-डेबिट कार्डने व्यवहार केल्यास मोठी सवलत आणि कॅशबॅक ॲाफर देण्यात येत आहेत.
3 / 7
बँकेने कार लोन, पर्सनल लोन, वाहन आणि गोल्ड लोनवर घेण्यात येणारे प्रोसेसिंग शुल्क माफ केले आहे. कार्डने पेमेंट केल्यानंतर सणासुदीच्या सवलतीच्या अंतर्गत ग्राहकांना वेगवेगळ्या खरेदीवर २२.५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. २५ प्रकारचे स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डला ईएमआयवर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १५ टक्क्यांपर्यंत कॅशबॅक ॲाफरही देत आहेत.
4 / 7
४० लाख रुपयांपर्यंतच्या पर्सनल लोनसाठी १०.५० टक्के व्याजदर, ७.९० टक्के व्याज दराने प्रत्येक १० मिनिटांमध्ये वाहन कर्ज तसेच कोणतेही फोरक्लोजर शुल्क लागणार नाही, ९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर दुचाकी खरेदी करण्यासाठी कर्ज, ५० लाख रुपयांपर्यंतचे टॉप अप लोन स्वस्त व्याजदरात उपलब्ध, कोणतीही वस्तू गहाण न ठेवता प्रोसेसिंग शुल्कात ५० टक्के सवलतीत व्यावसायिक कर्ज, प्रोसेसिंग शुल्कात ५० टक्के डिस्काउंटसह गोल्ड लोनसारख्या सुविधाही बँकेकडून देण्यात येत आहेत.
5 / 7
विविध संकेतस्थळांवरील मोबाईल, गॅझेट तसेच इतर खरेदी डेबिट, क्रेडिट कार्डने केल्यास २५ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, केवळ ११०० रुपयांच्या प्रोसेसिंग शुल्कासह गृहकर्ज मंजुरी. याचवेळी प्री अप्रूव्हड बॅलन्स ट्रान्स्फरचाही लाभ, प्रॉपर्टी लोनच्या प्रोसेसिंग शुल्कावर ५०% सवलत, १२ ईएमआय भरल्यानंतर ग्राहकाला पर्सनल लोनवर प्री क्लोजर शुल्क माफ, अशी काही सूटही देण्यात येत आहे.
6 / 7
युनियन बँक ॲाफ इंडियासह पंजाब नॅशनल बँकेनेही प्रत्येक प्रकारच्या लोनचे प्रोसेसिंग शुल्क, डॉक्युमेंटेशन शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सेंट्रल बँक ॲाफ इंडियानेही प्रत्येक प्रकारच्या कर्जावर आपला व्याजदर कमी केला आहे.
7 / 7
कंपन्यांनी सेल सुरू केला असून, प्रत्येक मिनिटाला १,१०० मोबाइलची विक्री होतेय. चार दिवसांमध्येच २४,५०० कोटी रुपयांचा फायदा कंपन्यांना झाला आहे.
टॅग्स :bankबँकShoppingखरेदीMONEYपैसा