शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सणासुदीच्या दिवसांत होम लोनसाठी बँका देताहेत खास ऑफर, असे आहेत व्याजदर

By बाळकृष्ण परब | Published: October 25, 2020 7:49 AM

1 / 10
कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनमुळे यावर्षी अनेक उद्योग व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. सर्वच वर्गांवर आर्थिक संकट कोसळल्याने गृहखरेदीही मंदावली आहे. मात्र आता दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांत अनेक बँका कमीत कमी व्यासदरासह अनेक ऑफर्ससह होमलोन देत आहेत. आज आपण जाणून घेऊया कुठल्या बँका काय ऑफर देत आहेत आणि कुठून होम लोन घेतल्यास ते अधिक फायदेशीर ठरेल याविषयी.
2 / 10
बँक ऑफ बडोदा फेस्टिव्हर ऑफर अंतर्गत होम लोनच्या सध्याच्या व्याजदरावर ०.२५ टक्क्यांची सवलत देत आहे. याशिवाय बँक प्रोसेसिंग फीसुद्धा घेणार नाही. या ऑफरचा लाभ बँकेत लोन ट्रान्सफर केल्यावरही मिळणार आहे. बँक ऑफ बडोदाकडून ७.०० ते ८.६० वार्षिक व्याजदराने होमलोन ऑफर करण्यात येत आहे. त्यावर तुम्हाला फेस्टिव्हल ऑफरचासुद्धा लाभ मिळू शकतो.
3 / 10
पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना फेस्टिव्ह बोनान्झा ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत बँक होमलोनवर सर्व प्रकारचे अपफ्रंट, प्रोसेसिंग चार्ज आणि डॉक्युमेंट चार्ज घेणार नाही. ग्राहक या ऑफरचा फायदा पीएनबी शाखांच्या डिजिटल चॅनेलच्या माध्यमातून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत घेऊ शकतील. सध्या ही बँक ७.१० ते ७.९० टक्के वार्षिक व्याजदरावर होमलोन देत आहे.
4 / 10
बँक ऑफ इंडिया लँडर ६.८५ च्या दराने होम लोन देत आहे. बँक ऑफ इंडिया कर्जाच्या एकूण रकमेवर ०.२५ टक्के दराने प्रोसेसिंग फी वसूल करते. ही रक्कम किमान १५०० आणि कमाल २० हजार रुपयांपर्यंत असते.
5 / 10
सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून होम लोन घेतल्यास तुम्हाला ६.८५ टक्के दराने व्याज द्यावे लागेल. बँकेने लोनच्या रकमेच्या ०.५० टक्के एवढी प्रोसेसिंग फी ठेवली आहे. मात्र त्यासाठी बँकेने २० हजार रुपये एवढी कमाल मर्यादा निश्चित केली आहे. ७५ लख रुपयांच्या होम लोनवर २० वर्षांच्या अवधीसाठी ६.८५ टक्के व्याज दराने लोन देण्यात येत आहे.
6 / 10
स्टेट बँक ऑफ इंडियाने होम लोनवर प्रोसेसिंग फी माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यासाठी ग्राहकांना बँकेचे अॅप योनो (YONO) वरून अर्ज करावा लागेल. एसबीआयने सांगितले की, ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर चांगला असेल त्यांना १० बीपीएस म्हणजेच ०.१० टक्के रकमेची व्याजामध्ये विशेष सवलत मिळणार आहे.मात्र ही सूट कर्जाच्या रकमेवर अवलंबून असेल. एसबीआय ६.९५ पासून ७.९५ टक्के वार्षिक व्याज दरावर होम लोन ऑफर देत आहे.
7 / 10
एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी फेस्टिव्ह ट्रिट्स २.० लाँच केले आहे. या अंतर्गत कर्जावर प्रोसेसिंग फीमध्ये सूट आणि ईएमआयमध्ये सवलतीसोबत ग्राहकांना कॅशबॅक, गिफ्ट व्हाउचर आणि इतर अनेक लाभही मिळतील. एचडीएफसी बँक ६.९५ पासून ७.६५ टक्के वार्षिक व्याज दरावर होमलोनची ऑफर देत आहे.
8 / 10
आयसीआयसीआय बँकेने फेस्टिव्ह बोनान्झा ऑफर लाँच केली आहे. ज्यामध्ये अनेक ऑफर मिळत आहेत. याअंतर्गत व्याजदर ६.९० टक्क्यांपासून सुरू होत आहे. तसेच प्रोसेसिंग फी ३ हजार रुपये निर्धारित करण्यात आली आहे.
9 / 10
सणावारांच्या या दिवसांमध्ये कोटक महिंद्रा बँकेने होम लोनवरील व्याज घटवून ७ टक्के एवढे निर्धारित केले आहे. बँकेने आपल्या सणावारांनिमित्तच्या खास ऑफरमध्ये अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ही बँक लोनवर प्रोसेसिंग फीस घेणार नाही.
10 / 10
टाटा हाउसिंगच्या ऑफरनुसार गृह खरेदीदाराला होम लोनवर एका वर्षासाठी केवळ ३.९९ टक्के व्याज द्यावे लागेल. कंपनी संभाव्य ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उर्वरित खर्च स्वत: उचलणार आहे. ही स्कीम २० नोव्हेंबरपर्यंत १० प्रोजेक्टसाठी लागू राहणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार ग्राहकांना बुकिंगनंतर प्रॉपर्टीच्या आधारावर २५ हजार रुपयांपासून आठ लाख रुपयांपर्यंतचे गिफ्ट व्हाउचर मिळती. व्हाऊचर १० टक्के रक्कम भरल्यावर आणि प्रॉपर्टीच्या रजिस्ट्रेशननंतर जारी केले जातील.
टॅग्स :HomeघरbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र