Be careful! paying through UPI? Follow these tips to save money from theft, hackers
सावधान! तुम्ही UPI द्वारे पेमेंट करत असालच? या टिप्स फॉलो करा पैसे चोरीपासून वाचवा... By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 6:06 PM1 / 11आपला देश डिजिटल इंडिया झाला आहे. साध्या साध्या पान टपरीवर देखील बारकोड स्कॅन करून मोबाईल अॅपद्वारे पेमेंट केले जात आहे. युपीआयद्वारे कुठेही पेमेंट केले जाऊ शकते. एवढेच नाही तर जर कोणी दुसऱ्या शहरात असेल आणि त्याला पैसे पाठवायचे असतील तर काही क्षणांत बँकेत न जाता पैसे पाठविण्याएवढे सोपे काम युपीआयने केले आहे. 2 / 11मात्र, ऑनलाईन जेवढे सोपे झाले आहे ना तेवढेच ते जास्त खतरनाकही बनले आहे. कारण हॅकरची नजर आता युपीआय ट्रान्झेक्शनवर पडली आहे. अशा प्रकारचे सायबर हल्ल्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. जर तुम्ही प्रयत्न केला तर ते रोखूही शकता. 3 / 11अशाप्रकारच्या सायबर क्राईममध्ये काही सावधानता बाळगावी लागते. जर तुम्ही युपीआयद्वारे पेमेंट करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. चला जाणून घेऊया काय काळजी घ्यावी...4 / 11युपीआय आता केवळ भीम अॅपद्वारेच करता येते असे नाही. बाजारात आता फोन पे, गुगल पे (जीपे), पेटीएम, जिओ पे सारखे असंख्य पर्याय आहेत. यातील तीन चार अॅपवर तरी तुम्ही रजिस्टर केले असेलच. एवढ्या साऱ्या अॅपचा युपीआय नंबरही एकसारखा असेलच. कारण लक्षात राहत नाही. हा सर्वात मोठा धोका आहे. युपीआय पिन वेगवेगळा ठेवा. 5 / 11जर कोणी तुम्हाला पेमेंट अॅपद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे क्यू आर कोड पाठवत असेल तर चुकूनही तो स्कॅन करू नका. तुमचा पैसा हे हॅकर उडवू शकतात. फेसबुकवर सध्या क्लोन अकाऊंट बनवून त्यांच्या मित्रांकडून पैसे मागितले जात आहेत. 6 / 11जर तुम्हाला तुमचा युपीआय पिन टाकण्यासाठी एखादी लिंक किंवा जी साईट तुम्ही ओळखत नाही ते विचारत असतील तर पिन टाकू नका. तुमच्या खात्यातील पैसे चोरले जाऊ शकतात. 7 / 11जर तुम्ही विक्रेते असला तर कोणत्य़ाही प्रकराचे देणे युपीआयद्वारे देऊ नका. म्हणजेच एखाद्याने तुम्हाला तुमच्या खात्यावर आधी 1 नाहीतर 10 रुपये पाठवून बघतो असे सांगत रिक्वेस्ट पाठवली तर ती स्वीकारू नका. जर कोणी तुम्हाला पैसे पाठवणार असेल तर युपीआय आयडी त्याला द्या, जो तुमच्या ओळखीचा असेल. 8 / 11हॅकर दरवेळी नवनवीन क्लुप्त्या काढत असतात. OLX सारख्या खरेदी विक्रीच्या साईटवर तर नुसता धुमाकूळ सुरु आहे. ऑनलाईन पैसे देणे धोक्याचे आहे. यामुळे व्यक्तीगत जाऊन त्यांना भेटावे, मगच खात्री पटल्यावर व्यवहार करावा. 9 / 11जर शक्य असेल तर समोरच्या व्यक्तीची माहिती काढावी. अनेकदा घोटाळेबात डील करण्यासाठी घाई करतात. या घाईघाईत अनेकजण फसतात आणि पैसे पाठवून बसतात.10 / 11फिशिंग हा एक खतरनाक प्रकार आहे. हुबेहुब वेबसाईट किंवा वेबपेज बनविलेले असते. युआरएलमध्ये काहीसा फरक असतो. त्यामुळे आपण तेच खरे वेबपेज असल्याचे म्हणतो. तसे नसते. यामुळे पेमेंट करतेवेळी कोणत्याही UPI अॅपचे नाव येते आणि आपण तिथे युपीआय क्रमांक टाकतो. पुढे पिन टाकतो. परंतू तो हॅकरकडे जातो आणि लगेचच पैसे कट होतात. 11 / 11हा प्रकार टाळण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती ते पाहूनच व्यवहार करावेत. युआरएल स्पेलिंग पहावे, चुकीचे असेल तर थेट पेज बंद करावे. आणखी वाचा Subscribe to Notifications