शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वयाच्या चाळीशीत बनाल कोट्यधीश; फक्त १५*१५*१५ फॉर्म्युला लक्षात ठेवा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 12:19 PM

1 / 10
आता तर केवळ २५ वय आहे. मज्जामस्ती करायचा टाईम आहे. नंतर बचतीचं बघू..नेहमी युवकांमध्ये बचतीबद्दल असं ऐकताना पाहिले असेल. परंतु वाढत्या वयासोबत जबाबदारी आणि खर्चही वाढतात. अशावेळी Saving करणं आणखी कठीण होते.
2 / 10
पण आजच्या युगात असे काही तरुण आहेत जे करिअरच्या सुरुवातीपासून म्हणजेच पहिल्या नोकरीपासून बचतीवर लक्ष केंद्रित करतात. इतकेच नाही तर काही लोक वयाच्या ४०, ४५ आणि ५० व्या वर्षी सेवानिवृत्तीचे नियोजन करू लागतात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमच्या पहिल्या नोकरीपासून बचत करायला सुरुवात करता. तुम्हालाही १५ वर्षांनी निवृत्त व्हायचे असेल तर हा फॉर्म्युला तुमच्या कामी येणार आहे.
3 / 10
वास्तविक, हा फॉर्म्युला २५ वर्षे ते ४५ वर्षे वयोगटातील लोकांना बसतो. हा फॉर्म्युला फक्त १५ वर्षे अवलंबण्याचा प्रयत्न करा. २५ वर्षांची मुले ४० वर्षात यशस्वी होतील. त्यांच्या ३० वयाचे ४५ वर्षात आणि ४० वयोगटातील लोक ५५ वर्षांच्या वयापर्यंत कोट्यधीश होतील
4 / 10
चला जाणून घेऊया असा कोणता फॉर्म्युला आहे, जो १५ वर्षात कोणालाही करोडपती बनवतो. आम्ही १५x१५x१५ नियमाबद्दल बोलत आहोत म्हणजे (१५*१५*१५ फॉर्म्युला). या सोप्या फॉर्म्युल्याने तुम्ही फक्त १५ वर्षात एक कोटी रुपये उभे करू शकता. त्याचवेळी या युक्तीतून ३० वर्षात १० कोटी रुपये उभे केले जाऊ शकतात. जर तुम्ही घर, गाडी, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न किंवा तुमच्या निवृत्तीचे नियोजन करत असाल तर या सूत्राने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता.
5 / 10
कोणतेही आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी गुंतवणूक करावी लागते आणि ती सातत्याने करावी लागते, १५x१५x१५ हे सूत्र म्युच्युअल फंडाशी जोडलेले आहे. आजच्या युगात, आर्थिक सल्लागार गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील एसआयपीची शिफारस करतात. कारण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे खूप सोपे आहे. कोणत्याही वयोगटातील लोक म्युच्युअल फंडात SIP करू शकतात. यामागे कंपाऊंडिंगची(Compounding) ताकद आहे. गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी चालू ठेवावी लागते असं पॉवर ऑफ कंपाउंडिंगचे सूत्र सांगते.
6 / 10
१५x१५x१५ सूत्र काय आहे? त्यात तीन १५ आहेत, पहिले १५ गुंतवणुकीची रक्कम ठरवतात. म्हणजेच दर महिन्याला १५००० रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी १५ म्हणजे ही गुंतवणूक १५ वर्षे सतत चालू ठेवणे. तर तिसरा १५ असं की त्या गुंतवणुकीवर वार्षिक १५ टक्के व्याज मिळावे.
7 / 10
तुम्हाला १५ वर्षे म्युच्युअल फंडात दरमहा १५ हजार रुपये गुंतवावे लागतील आणि या गुंतवणुकीवर १५ टक्के वार्षिक व्याज मिळावे. त्यानंतर १५ वर्षात गुंतवणूकदाराला एकूण १,००,२७,६०१ रुपये (१ कोटीपेक्षा जास्त) मिळतील. त्याच वेळी, या काळात गुंतवणूकदाराला २७ लाख रुपये जमा करावे लागतील, ज्यावर ७३ लाख रुपयांचे बंपर व्याज मिळेल.
8 / 10
जर तुम्ही १५x१५x१५ फॉर्म्युला अंतर्गत वयाच्या २० व्या वर्षापासून दरमहा १५ हजार रुपये गुंतवले तर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी करोडपती व्हाल. जर तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी सुरुवात केली तर तुम्ही ४० वर्षात करोडपती व्हाल. म्हणजेच वयाच्या ४० व्या वर्षी तुम्ही या निधीतून घर, कार आणि इतर स्वप्ने पूर्ण करू शकता.
9 / 10
तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितका फायदा तुम्हाला मिळेल. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही ३० वर्षात १० कोटींहून अधिक रक्कम जमा करू शकता. ज्यासाठी गुंतवणुकीची रक्कम (१५ हजार रुपये) आणि त्यावरील व्याज (१५ टक्के) दरमहा समान राहील, फक्त वेळ ३० वर्षांपर्यंत वाढेल. १५x१५x३० फॉर्म्युलानुसार, तुम्हाला ३० वर्षांसाठी दरमहा रु. १५००० ची SIP करावी लागेल. ज्यावर १५ टक्के व्याजाचा अंदाज आहे, जो म्युच्युअल फंडांनी गेल्या दोन दशकांत दिला आहे. १५x१५x३० फॉर्म्युलासह, तुम्ही १०,५१,४७,३०९ रुपये (१० कोटींहून अधिक) जमा करू शकता.
10 / 10
SIP चे फायदे - हे व्याज तुम्हाला नक्कीच हैराण करत असेल, परंतु हे शक्य आहे. कारण एसआयपीमध्ये चक्रवाढ सूत्रामध्ये व्याज जोडले जाते. सुरुवातीला मूळ गुंतवणुकीवर व्याज मिळते, नंतर व्याजावर व्याज मिळते. ज्याद्वारे तुम्ही दर महिन्याला नियमित गुंतवणूक करून करोडपती होऊ शकता.(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :Investmentगुंतवणूक