शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल्लीसह अनेक शहरांमध्ये तब्बल १६० रुपये प्रतिलीटर दराने विकले जातेय हे पेट्रोल, हे आहे कारण

By बाळकृष्ण परब | Published: March 03, 2021 8:55 PM

1 / 9
गेल्या काही दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये भडका उडाला आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपये प्रतिलीटरपर्यंत पोहोचला आहे.
2 / 9
दरम्यान, देशातील काही शहरांमध्ये एक खासप्रकारचे पेट्रोल १६० रुपये प्रतीलीटर दराने विकले जात आहे. या पेट्रोलचे खास वैशिष्ट्य आहे. या पेट्रोलमध्ये नेमकी काय खासीयत आहे ती जाणून घेऊया.
3 / 9
इंडियन ऑइलने गतवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये एक खास प्रकारचे हाय ऑक्टेन प्रीमियम ग्रेड पेट्रोल लाँच केले होते. त्याचे नाव XP100 ठेवण्यात आले होते. या पेट्रोलची किंमत १६० रुपये लीटर आहे.
4 / 9
हे खास प्रकारचे पेट्रोल सध्या दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, आग्रा, जयपूर, चंदीगड, लुधियाना, मुंबई, पुणे आणि अहमदाबादमधील काही खास पेट्रोल पंपांवर उपलब्ध आहे.
5 / 9
पुढच्या टप्प्यात हे पेट्रोल चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता आणि भुवनेश्वर या शहरांमध्येही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे पेट्रोल बेस्ट इन क्लास आणि प्रीमियम फ्लुएल आहे, असा दावा इंडियन ऑईलकडून करण्यात येत आहे. अशा प्रकारचे प्रीमियम पेट्रोल सध्या जर्मनी आणि अमेरिकेसारख्या अॅडव्हान्स देशांमध्येच मिळते.
6 / 9
या पेट्रोलमध्ये १०० ऑक्टेन असते. तर सामान्य पेट्रोलमध्ये ९१ ऑक्टेन असते. हे पेट्रोल सामान्य वाहनांमध्येही वापरले जाते. मात्र याचा पूर्ण फायदा तेव्हाच मिळतो. जेव्हा वाहनाचे इंजिन मिळत्या जुळत्या कॉन्फिगरेशनचे असते. हे पेट्रोल इंडियन ऑइलने ऑक्टोमॅक्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने वर्ल्ड क्लासच्या आरएँडडीकडून तयार करण्यात आले आहे.
7 / 9
हे पेट्रोल लक्झरी कार, लक्झरी बाइकसारख्या हाय कॉम्प्रेशन रेश्यो असलेल्या इंजनांसाठी त्यांचा परफॉर्मंससाठी वापरले जाते. मात्र याला सामान्य वाहनांमध्येही वापरता येऊ शकते.
8 / 9
इंडियन ऑइलच्या दाव्यानुसार XP100 मध्ये अँटिनॉक गुण असतात. ते इंजिनाची क्षमता सुधारतात. आणि अॅक्सिलरेशनचा वेग वाढवते. इंधनाची ताकद वाढवते आणि इंजिनाचे आयुर्मानही वाढवते. हे पर्यावरणाच्या दृष्टीने एक उत्तम आणि कमी कार्बन उत्सर्जन करणारे इंधन आहे. या इंधनाच्या वापरामुळे इंजिनाच्या मेंटेनन्सच्या देखभालीच्या खर्चामध्येही घट होते.
9 / 9
सामान्य पेट्रोलमध्ये मिसळल्यास काय होईल - इंडियन ऑइलने सांगितले की, जर १०० ऑक्टेनवाले एक्सपी १०० पेट्रोल ९१ ऑक्टेनवाल्या सामान्य पेट्रोलमध्ये मिसळून तुम्ही वाहनामध्ये घातल्यास त्यामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. त्यामुळे गाडीची क्षमता अधिक चांगली होईल. जर कुणी सामान्य वाहनामध्ये हे पेट्रोल वापरले तर पुन्हा एकदा साध्या पेट्रोलचा वापर करता येणार आहे.
टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंप