शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फिक्स्ड अन् फ्लोटिंग रेट, होमलोन घेण्यापूर्वी, दोन्हीमधील फरक समजून घ्या; फायदे आणि तोटे बघून निर्णय घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 3:21 PM

1 / 9
आपलं स्वत:चं घर असाव हे स्वप्न प्रत्येकाचं असतं. हे स्वप्न साकार करण्यात होमलोन महत्त्वाची भूमिका बजावते. तुमचे हे स्वप्न तुम्ही होम लोनद्वारे पूर्ण करू शकता. होमलोन घेत असताना आपल्याला महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
2 / 9
जेव्हाही तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँक किंवा वित्तीय संस्थेत जाता तेव्हा तुम्हाला स्थिर दर आणि फ्लोटिंग रेट यामधील एक पर्याय निवडावा लागतो.
3 / 9
गृहकर्जावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी यापैकी कोणता पर्याय निवडायचा? दोन्हीचे फायदे-तोटे जाणून घेऊनच निर्णय घ्यावा लागतो.
4 / 9
निश्चित दर म्हणजे कर्जाच्या संपूर्ण कालावधीसाठी व्याजदर समान राहील. व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. याशिवाय EMI देखील बदलणार नाही.
5 / 9
जर तुम्ही ३० वर्षांसाठी ८.२० टक्के दराने गृहकर्ज घेतले असेल यामध्ये मासिक ईएमआय २२,००० रुपये आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला ३० वर्षांसाठी २२,००० रुपये मासिक EMI भरावे लागेल, म्हणजेच ३० वर्षांपर्यंत EMI मध्ये कोणताही बदल होणार नाही.
6 / 9
तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की अनेक बँका ठराविक दरांना काही काळानंतर फ्लोटिंग रेटमध्ये रूपांतरित करतात. गृहकर्ज घेण्यापूर्वी, आपण आधी त्याच्याशी संबंधित गोष्टींची खात्री केली पाहिजे.
7 / 9
फ्लोटिंग रेटमध्ये व्याजदर बदलत राहतात. यामध्ये व्याजदर बँकेच्या बेंचमार्क दरांशी संरेखित केला जातो. ज्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेपो दरात कोणताही बदल करते तेव्हा गृहकर्जाचे व्याजदर बदलतात. व्याजदरातील बदलांसह, EMI देखील बदलते. जर व्याजदर वाढला पण तुम्हाला ईएमआय वाढवायचा नसेल तर कर्जाचा कालावधी वाढतो.
8 / 9
फिक्स्ड रेट लोनमध्ये, EMI स्थिर राहते, यामुळे तुमचे व्याजदर आणि ईएमआयवर कोणताही परिणाम होत नाही. फ्लोटिंग रेट कर्जावरील व्याजदर वाढल्यामुळे ईएमआय देखील वाढू शकतो. याचा तुमच्या बचतीवर आणि बजेटवर परिणाम होतो.
9 / 9
फ्लोटिंग रेटमध्ये कर्जाचा कालावधी वाढल्यामुळे किंवा ईएमआयमध्ये वाढ झाल्यामुळे समस्या येऊ शकतात. तर निश्चित दरात त्याचा कोणताही परिणाम होत नाही. मात्र, बेंचमार्क रेट घसरले तरी त्याचा फायदा मिळत नाही.
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनbankबँक