शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fintech Slice स्टार्टअप कंपनीची भन्नाट ऑफर! आठवड्यातून केवळ ३ दिवस काम करा, पूर्ण पगार घ्या; पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 4:40 PM

1 / 12
देशभरात कोरोनाची दुसरी लाट कायम असली, तरी त्याचा प्रभाव ओसरताना दिसतोय. त्यामुळे अनेक बड्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये कामासाठी बोलवण्यास सुरुवात केली आहे. कोरोना संकटामुळे सुमारे दीड वर्ष बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारला होता.
2 / 12
आयटी, सेवा क्षेत्रासह अनेक मोठ्या कंपन्यांनी हळूहळू कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यास सांगितले आहे. तर काही कंपन्यांनी काही दिवस घरून काम आणि काही दिवस ऑफिसमधून काम असे धोरण आखण्याची योजना सुरू केली आहे.
3 / 12
मात्र, बेंगळुरू येथील एका कंपनीने भन्नाट योजना कर्मचाऱ्यांसमोर ठेवली आहे. ही एक स्टार्टअप कंपनी असून, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवे मॉडेल आणले आहे. या स्टार्टअपने आठवड्यातून फक्त तीन दिवस काम करण्याची ऑफर कर्मचाऱ्यांना दिली आहे.
4 / 12
अशी सुविधा देणाऱ्या स्टार्टअपचे नाव आहे स्लाइस. ही फिनटेक कंपनी आहे. स्लाईस नवीन कर्मचार्‍यांना आठवड्यातून फक्त तीन दिवस काम करण्याची ऑफर देत आहे, पण त्यांचे वेतन हे चालू बाजारभावाच्या ८० टक्के असेल, अशी अट त्यांनी घातली आहे.
5 / 12
कंपनीचे संस्थापक राजन बजाज म्हणाले की, हा एक चांगला दृष्टिकोन आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना इतर गोष्टी किंवा आवडींचा पाठपुरावा करण्यासाठी वेळ मिळतो. हे कामाचे भविष्य आहे. लोक नोकऱ्यांमध्ये अडकून राहू इच्छित नाहीत. कर्मचारी आठवड्यातून तीन दिवस काम करून वेतन आणि पूर्ण लाभ मिळवू शकतात.
6 / 12
त्यांचा उर्वरित वेळ स्टार्टअपच्या स्वप्नासाठी, सह-संस्थापक शोधण्यासाठी किंवा कामाशिवाय आपली आवड शोधण्यात घालवू शकतात, असेही त्यांनी सांगितले. आयटी आउटसोर्सर्स, सिलिकॉन व्हॅली जायंट्स, ग्लोबल रिटेलर्स आणि वॉल स्ट्रीट बँकांच्या तंत्रज्ञान केंद्रांमध्ये शेकडो स्टार्टअप्स तेजीत आहेत.
7 / 12
सध्या स्लाइसमध्ये ४५० कर्मचारी आहेत आणि पुढील तीन वर्षांत एक हजार अभियंते आणि उत्पादन व्यवस्थापकांची भरती करण्याचा विचार करीत आहेत. २०१६ मध्ये स्थापित, स्लाईस भारतातील तरुणांना क्रेडिट कार्ड प्रदान करण्यात अग्रेसर आहे.
8 / 12
सन २०१९ मध्ये, कंपनीने आपले भौतिक कार्ड एका मिनिटापेक्षा कमी साइन-अप, कॅशबॅक आणि एकाधिक पेमेंट पर्यायांसह लॉन्च केले. स्लाइसने गेल्या महिन्यात १,१०,००० कार्ड जारी केले, ज्यामुळे ते देशातील प्रमुख कार्ड प्रदात्यांपैकी (प्रोव्हायडर्स) एक बनले.
9 / 12
दरम्यान, सन १९२६ मध्ये, हेन्री फोर्ड यांनी सहा दिवसांच्या ऐवजी पाच दिवसांच्या कामाचा आठवडा स्वीकारला. तरीही उत्पादनक्षमतेवर काही परिणाम झाला नाही. या प्रयोगानंतर अनेक कंपन्यांनी आणि देशांनी पुन्हा चार दिवसांच्या कामाचा आठवड्याचे वर्षानुवर्षे पालन केले आहे.
10 / 12
‘वर्क फ्रॉम होम’ची सवय झालेले कर्मचारी पुन्हा कार्यालयात जाऊन काम करण्यास नाखुश असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. कंपनीने कार्यालयात येऊन काम करायला सांगितल्यास आपण नोकरी सोडण्यास तयार असल्याचे तब्बल ५८ टक्के लोकांनी या सर्वेक्षणात सांगितले.
11 / 12
मागील सुमारे दीड वर्षांपासून असंख्य कंपन्यांचे कर्मचारी घरून काम करीत आहेत. आयटी कंपन्यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. आता लाट ओसरत आल्यामुळे कंपन्यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून घेण्याची तयारी चालविली आहे.
12 / 12
तथापि, कर्मचारीच आता कार्यालयातून काम करण्यास इच्छुक नसल्याचे समोर येत आहे. पुन्हा कार्यालयांत परतण्यास केवळ २ टक्के कर्मचाऱ्यांनी पसंती दिली आहे. बाकी सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू राहावे, असे वाटते.
टॅग्स :businessव्यवसायBengaluruबेंगळूर