Benu Gopal Bangur cement Group, Age 92 and wealth 55000 crore rupees
वय 92 अन् संपत्ती 55000 कोटी रुपये, असं उभारलं साम्राज्य; फोर्ब्सच्या यादीतही नाव... By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 4:59 PM1 / 5 एकीकडे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे, तर दुसरीकडे देशातील अब्जाधीशांची संख्याही सातत्याने वाढत आहे. भारतातील श्रीमंतांच्या यादीत तरुणांपासून वयस्करांपर्यंत, अनेकजण आहेत. यामध्ये बंगालमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बेनू गोपाल बांगुर यांचेही नाव आहे. 92 वर्षीय बांगुरांचे नाव फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत असून, ते अजय पिरामल, एनआर नारायण मूर्ती यांसारख्या दिग्गज अब्जाधीशांपेक्षा खूप पुढे आहेत.2 / 5भारतीय अब्जाधीशांमध्ये 19 व्या स्थानावर - फोर्ब्सच्या भारतीय अब्जाधीशांच्या यादीत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बेनू गोपाल बांगुर 19व्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर आहे, जी भारतीय चलनात 55,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. 92 वर्षीय बांगूर हे 'श्री' सिमेंटचे चेअरमन आहेत. त्यांच्या कंपनीचे बाजार भांडवल 86750 कोटी रुपये आहे. बांगुर समूह देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे आणि त्याची स्थापना बेनू गोपाल बांगुर यांचे आजोबा मुंगी राम बांगुर, त्यांचा भाऊ राम कूवर बांगुर यांनी केली होती. 1991 मध्ये समूहाच्या विविध व्यवसायांची पाच विभागांमध्ये विभागणी करण्यात आली. यापैकी सिमेंट क्षेत्र बेनू गोपाल सांभाळतात.3 / 5अशी मिळाली श्री सिमेंटकडे जबाबदारी - बेनू गोपाल बांगुर यांनी वारशाने मिळालेल्या व्यावसायिक कौशल्यांचा चांगला वापर केला आणि त्यामुळेच श्री सिमेंट या क्षेत्रातील मोठी कंपनी बनली. व्यवसायातील तेजीमुळे त्यांची संपत्ती प्रचंड वाढली आणि आज देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टॉप-20 यादीत त्यांचा समावेश झाला आहे. बेनू गोपाल बांगुर यांच्या आजोबांनी 1979 साली राजस्थानमधील जयपू येथे श्री सिमेंटची स्थापना केली होती. यानंतर, त्यांनी श्री सिमेंटमध्ये 65 टक्के मालकी हक्क त्यांच्या इच्छापत्रानुसार सोडला आणि त्यांच्यानंतर 1992 मध्ये बेनू गोपाल बांगुर यांना श्री सिमेंटचे चेअरमनपद मिळाले. सिमेंट क्षेत्रातील या जुन्या कंपनीचा दबदबा आजही कायम असून, व्यवसाय सातत्याने वाढत आहे.4 / 522 वर्षांत कंपनीच्या स्टॉकने गाठला उच्चांक- 2001 ते 2023 या 22 वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरच्या किमतीत झालेली उडी पाहून व्यवसायाचा अंदाज लावता येतो. 6 जुलै 2001 रोजी श्री सिमेंटच्या एका शेअरची किंमत 30.30 रुपये होती, तर बुधवार, 19 जुलै 2023 रोजी दुपारी 1.08 वाजता हा शेअर 24,045.20 रुपयांवर व्यवहार करत होता. विशेष म्हणजे श्री सिमेंटला देशात बांगुर सिमेंट म्हणूनही ओळखले जाते. कंपनी रुफॉन, बांगुर पॉवर, श्री रस्टप्रूफ आणि रॉकस्ट्राँग या ब्रँड नावाने आपली उत्पादने तयार करते.5 / 5सध्या कोलकात्यात वास्तव्य - बेनू गोपाल बांगुर मूळ कोलकाता येथील रहिवासी आहेत. त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून B.Com ची पदवी प्राप्त केली आणि कोलकात्याच्या पहिल्या पदवीधरांपैकी एक आहेत. 2002 पासून त्यांच्या सिमेंट व्यवसायाची जबाबदारी त्यांचा मुलगा हरी मोहन बांगुर सांभाळत आहे. बेनू गोपाल कोलकात्यात एका आलिशान घरात कुटुंबासोबत राहतात. त्यांची हवेली अंदाजे 51,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications