शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Best Credit Cards in Market: पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड घेणार असाल तर, हे ऑप्शन आहेत बेस्ट...कसे निवडाल, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 2:27 PM

1 / 10
आजकाल कोणाकडे गरजेवेळी पैसे मागायला कसेतरी वाटते. जो-तो कमवतो, त्याचे त्याचे प्रॉब्लेम असतात. तुम्ही संकटात असताना कोणा ना कोणाकडे तरी उसणे पैसे मागितले असतील, बऱ्याचदा नकार आला असेल किंवा त्यांनी देतो , देतो करून नंतर फोन उचलणेही टाळले असेल. अशावेळी बँका आपल्या उपयोगी पडतात.
2 / 10
बँका आपल्याला कर्ज देतात, त्या बदल्यात त्या व्याजही आकारतात. असाच एक प्रकार क्रेडिट कार्डचा आहे. आज बरेचजण क्रेडिट कार्ड वापरतात. परंतू त्यांना कमी जास्त प्रमाणावर ऑफर मिळतात. कमी जास्त व्याजदर असतो. मग ते ही क्रेडिटकार्ड घेऊन पस्तावतात. यामुळे जर तुम्ही नवीन क्रेडिट कार्ड घेणार असाल तर तुम्हाला बाजारातील चांगली क्रेडिट कार्डचा अभ्यास करावा लागेल.
3 / 10
पहिल्यांदाच घेत असाल तर मिळेल ते क्रेडिट कार्ड घेऊ नका. तर त्या बँकेच्या किती ऑफर्स असतात, किती कॅशबॅक मिळतो ते आधी पहा. तुम्हाला सुरुवातीला तुमची गरज ओळखता आली पाहिजे. महत्वाचे म्हणजे मला क्रेडिट स्कोअर वाढवायचा आहे किंवा पुढे कर्ज काढायचे आहे, म्हणून क्रेडिट कार्ड काढले की त्याचा फायदा होईल हा विचार करत असाल तर सावध व्हा. चला पाहुया कोणती क्रेडिट कार्ड चांगली आहेत....
4 / 10
तुम्हाला आधी कोणत्या कारणासाठी क्रेडिट कार्ड वापरायचे आहे याचा विचार करावा, जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर तुम्हाला आयसीआयसीआय बँकेचे अॅमेझॉन सोबत टायअप केलेले कार्ड किंवा अॅक्सिस बँकेचे फ्लिपकार्टसोबत टायअप केलेले कार्ड चांगले आहे.
5 / 10
Amazon Pay ICICI Bank Credit Card द्वारे तुम्ही अॅमेझॉनवर खरेदी केली तर प्राईम मेंबरना ५ टक्के आणि नॉन प्राईम मेंबरना ३ टक्के अनलिमिटेड रिवॉर्ड पॉईंट मिळतात. तसेच थेट डिस्कऊंटही दिला जातो.
6 / 10
फ्लिपकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही फ्लिपकार्ट आणि मंत्रावर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळतो. याद्वारे तुम्ही Cleartrip, PVR, Uber, Swiggy, Cure.Fit, Tata 1mg आणि Tata Sky वर देखील ४ टक्के कॅशबॅक मिळवू शकता.
7 / 10
एक्सिस बँकेचे आणखी एक असे क्रेडिट कार्ड आहे, ज्याद्वारे गुगल पेवर होणाऱे रिचार्ज आणि बिल पेमेंटवर ५ टक्के कॅशबॅक मिळतो. स्विगी, झोमॅटो आणि ओलावर ४ टक्के सूट आणि सर्व ऑनलाईन, ऑफलाईन खर्चावर २ टक्के सूट मिळते.
8 / 10
एसबीआय सिंपलीक्लिक क्रेडिट कार्ड (SBI SimplyCLICK Credit Card) द्वारे Amazon, Apollo24X7, BookMyShow, Cleartrip, Eazydiner, Lenskart आणि Netmeds वर खर्च केल्यावर 10X रिवॉर्ड पॉईंट भेटतात. तसेच दुसऱ्या खर्चांवर 5X रिवॉर्ड प्वाइंट मिळतात.
9 / 10
एचएसबीसी कॅशबॅक क्रेडिट कार्ड (HSBC Cashback Credit Card) द्वारे तुम्हाला ई-वॉलेट रिलोड सोडून सर्व ऑनलाईन खर्चावर दीड टक्के आणि अन्य खर्चांवर एक टक्का कॅशबॅक मिळतो.
10 / 10
याशिवाय एचडीएफसी, आयसीआयसीआयच्या क्रेडिट कार्डांवर अॅमेझॉन, फ्लिपकार्टवर १० टक्के कॅशबॅक दिला जातो. यामुळे तुम्हाला कशासाठी क्रेडिट कार्ड हवे आहे ते महत्वाचे आहे. काही कंपन्यांची पेट्रोल, डिझेलवर कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट देणारी कार्ड आहेत. जर तुम्ही वाहन जास्त चालवत असाल म्हणजेच पेट्रोल पंपावर जास्त वेळा जात असाल तर या प्रकारची कार्डे योग्य ठरतील.
टॅग्स :MONEYपैसा