शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ १ रिचार्ज आणि ५ जणांना टेन्शन नाही: सर्वांना मिळणार Unlimited डेटा, कॉल्स, पाहा ४ बेस्ट प्लॅन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:49 PM

1 / 12
कुटुंबातील सर्व सदस्यांना रिचार्ज करण्याचे काम तुम्हाला त्रासदायक किंवा कंटाळवाणं वाटत असेल तर आता टेन्शन घेऊ नका. आज आम्ही तुम्हाला अशा प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण कुटुंबासाठी फक्त एक रिचार्ज करावा लागणार आहे. सर्वच कंपन्या आपल्याला आवश्यक असलेले पोस्टपेड प्लॅन्स ऑफर करतात.
2 / 12
टेलिकॉम कंपन्यांद्वारे ऑफर करण्यात येणारे पोस्टपेड प्लॅन्स निरनिराळ्या प्राईज रेंजमध्ये येतात. तुमच्या सुविधेसाठी आम्ही व्होडाफोन आयडिया (Vodafone-Idea), एअरटेल (Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि बीएसएनएलच्या टॉप एन्ड फॅमिली प्लॅन्सची लिस्ट आणली आहे. यामध्ये अनेक बेनिफिट्सही मिळतात.
3 / 12
Vodafone-Idea निरनिराळ्या युझर्ससाठी आणि कुटुंबासाठी निरनिराळे प्लॅन्स पोस्टपेड प्लॅन्स ऑफर करत आहे. फॅमिली युझर्ससाठी Vi चा हाय एन्ड प्लॅन 2,299 रुपयांचा आहे आणि हा एक RedX प्लॅन आहे.
4 / 12
Vi चा RedX प्लॅन अनेक OTT सबस्क्रिप्शनसह अनेक फायद्यांसह यतो. प्लॅन कुटुंबातील 5 सदस्यांपर्यंत कनेक्टिव्हिटी ऑफर करतो आणि प्लॅनच्या प्राथमिक आणि दुय्यम कनेक्शनसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलसह दरमहा 3000 एसएमएससह अमर्यादित डेटा ऑफर करतो.
5 / 12
RedX प्लॅनच्या फायद्यांबद्दस सांगायचे झाले तर ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय टीव्ही आणि मोबाइलवर Netflix चं एका वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळवू शकतात. या प्लॅनमध्ये 1,499 रुपयांचे एक वर्षाचे Amazon प्राइम सबस्क्रिप्शन तसेच 499 रुपयांचे एका वर्षाचे Disney+ Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देखील दिले जाते. याव्यतिरिक्त रेडएक्स प्लॅन कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ लाउंज सेवाही ऑफर करते.
6 / 12
एअरटेल काही फॅमिली पोस्टपेड प्लॅन्सदेखील ऑफर करते आणि कंपनीचा सर्वात हाय एन्ड फॅमिली इन्फिनिटी प्लॅन 1599 रुपयांचा आहे. Airtel 1,599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये 500GB मासिक डेटा, अमर्यादित कॉल्स आणि 200GB पर्यंत डेटा रोलओव्हरसह दररोज 100 SMS मिळतात. प्लॅन 200 ISD मिनिटे आणि आयआर पॅकवर 10 टक्के सूट देखील देते.
7 / 12
यामध्ये एका रेग्युलर सिम सोबत एकाच कुटुंबाच्या सदस्यांसाठी 1 मोफत अॅड ऑन रेग्युलर वॉईस कॉल कनेक्शन दिलं जातं. याशिवाय युझर्सना एअरटेल थँक्स प्लॅटिनम रिवॉर्ड्सही मिळतात. यामध्ये कोणत्याही अतिरिक्त किमतीत 1 वर्षासाठी प्राईम मेंबरशीपसह डिज्नी+हॉटस्टार व्हीआयपी मेंबरशीपही दिली जाते.
8 / 12
जिओ वैयक्तिक आणि फॅमिली दोन्ही युझर्ससाठी अनेक पोस्टपेड योजना ऑफर करते. जिओचा सर्वात महागडा कौटुंबिक पोस्टपेड प्लॅन 999 रुपयांचा आहे. Jio त्यांच्या 999 रुपयांच्या प्लॅनसह तीन अतिरिक्त सिम कार्ड ऑफर करते. यामध्ये 200GB डेटा ऑफर केला जातो, तसंच 500GB डेटा रोलओव्हरही देण्यात येतो.
9 / 12
जिओ वैयक्तिक आणि फॅमिली दोन्ही युझर्ससाठी अनेक पोस्टपेड योजना ऑफर करते. जिओचा सर्वात महागडा कौटुंबिक पोस्टपेड प्लॅन 999 रुपयांचा आहे. Jio त्यांच्या 999 रुपयांच्या प्लॅनसह तीन अतिरिक्त सिम कार्ड ऑफर करते. यामध्ये 200GB डेटा ऑफर केला जातो, तसंच 500GB डेटा रोलओव्हरही देण्यात येतो.
10 / 12
हा प्लान अमर्यादित व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस ऑफर करतो. याशिवाय, Jio चा 999 रुपयांचा प्लॅन Netflix, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar यांसह अनेक OTT प्लॅटफॉर्म्सच्या सबस्क्रिप्शनसह येतो.
11 / 12
BSNL च्या टॉप-एंड फॅमिली पोस्टपेड प्लॅन प्रायमरी कनेक्शनसोबत तीन फॅमिली कनेक्शन ऑफर करते. 999 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएससह अमर्यादित व्हॉइस कॉल मिळतात. प्रायमरी युझर्सना 225GB पर्यंतच्या डेटा रोलओव्हरसह 75GB मोफत डेटा मिळतो.
12 / 12
सांगितल्याप्रमाणेच प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधेसह 3 फॅमिली कनेक्शन उपलब्ध आहेत. कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी दररोज 75GB डेटा आणि 100 SMS दिले जातात. हा प्लॅन सुरू करण्यासाठी ग्राहकांना एकदाच 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
टॅग्स :AirtelएअरटेलVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाReliance Jioरिलायन्स जिओ