शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Best Investment Tips: गुंतवणूकीची सुरुवात केल्यावर सर्वप्रथम पैसे कुठे गुंतवाल? Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिल्या टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 10:40 AM

1 / 7
Best Investment Tips Nithin Kamath: जेव्हा तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात करण्याचा विचार करता तेव्हा पैसे कुठे गुंतवायचे ही सर्वात पहिली अडचण असते. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म झिरोदाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
2 / 7
स्वतःचा आर्थिक प्रवास सुरू करण्याआधीच नितीन कामथ यांनी या पर्यायात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नितीन कामथ यांच्या मते, आरोग्य विमा योजना ही कुटुंबासाठी सर्वात महत्त्वाची आर्थिक गुंतवणूक आहे.
3 / 7
कोणत्या अन्य ठिकाणी किंवा अन्य पर्यायात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला जितकं परवडू शकतं तितकं हेल्थ कवर घ्या. सध्याची स्थिती पाहता ते सर्वात महत्त्वाचं असल्याचे ते म्हणाले.
4 / 7
नितीन कामत यांच्या मते, सध्या उपलब्ध असलेली नवीन आकडेवारी ही २०१४ सालची आहे. यानुसार, रुग्णालयात दाखल करण्यासाठी शहरांमध्ये २६४७५ रुपये तर खेड्यांमध्ये हा खर्च १६६७६ रुपये इतका आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दरवर्षी ६.३ कोटींहून अधिक भारतीयांकडे पैशांची कमतरता असल्याचंही म्हटलंय.
5 / 7
आरोग्य सेवांवरील खर्च वाढतच जाणार आहेत आणि याला सामोरं जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आरोग्य विम्याबद्दल सर्व भारतीयांमध्ये जागरूकता निर्माण करणं हाच असल्याचं कामथ म्हणाले.
6 / 7
नितीन कामथ यांनी इंडिया स्पेंडचं एक आर्टिकलही शेअर केलं आहे. जे खरंच विचार करायला लावणारं आहे. यानुसार विमा योजनांचा लाभ घेत नसल्यानं बहुसंख्य भारतीय कुटुंबाच्या आरोग्याशी निगडीत खर्चाचा भार आपणहूनच उचलत असल्याचं त्यात नमूद करण्यात आलंय.
7 / 7
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीनं दिलेल्या आकडेवारीवरून परिस्थिती किती भीषण आहे, याचा अंदाज येतो. या आकडेवारीनुसार, रुग्णालयाशी संबंधित खर्चामुळे सुमारे ८-९ टक्के भारतीय कुटुंबं दारिद्र्यरेषेखाली येतात.
टॅग्स :Healthआरोग्यbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूकNithin Kamathनितीन कामथ