शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गेल्या ५ वर्षात जास्त परतावा देणारे 'हे' पाच म्युच्युअल फंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 5:43 PM

1 / 9
जर तुम्ही थोडी जोखीम पत्करण्यास सक्षम असाल तर तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. दरम्यान, ज्यांना शेअर बाजाराचे ज्ञान आहे, त्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाची निवड अत्यंत महत्त्वाची आहे.
2 / 9
म्युच्युअल फंडांच्या गर्दीत तुम्ही कोणत्या आर्थिक फंडात गुंतवणूक करावी यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेऊ शकता. अनेक म्युच्युअल फंड ज्यांनी गेल्या काही वर्षात चांगले परतावा दिला आहे.
3 / 9
म्युच्युअल फंडांचे लार्ज-कॅप फंड, मिड-कॅप फंड, स्मॉल-कॅप फंड, फ्लेक्सी-कॅप फंड आणि ELSS च्या कॅटगरीमध्ये केले जाते. असेच 5 म्युच्युअल फंड आहेत, ज्यांनी गेल्या 5 वर्षात उत्तम परतावा दिला आहे.
4 / 9
1. अॅक्सिस ब्लूचिप फंड (लार्ज-कॅप) : अॅक्सिस म्युच्युअल फंड ब्ल्यू चिप स्टॉक किंवा मोठ्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो. या म्युच्युअल फंडाने गेल्या 5 वर्षात प्रतिवर्ष 23.45% परतावा दिला आहे. या फंडात तुम्ही 1000 रुपयांची SIP सुरू करू शकता.
5 / 9
2. कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड (लार्ज-कॅप) : कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड आठ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. याने देखील गेल्या 5 वर्षात चांगला परतावा दिला आहे. या फंडाने SIP वर गेल्या 5 वर्षात 22.14 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. त्याची AUM 3,691.25 कोटी रुपये आहे.
6 / 9
3. PGIM India Mid-Cap Opportunities Fund: पीजीआयएम इंडिया मिड-कॅप अपोर्च्युनिटीज फंडाने गेल्या 5 वर्षात SIP वर 33.21% परतावा दिला आहे. त्याची AUM 2,383.38 कोटी आहे.
7 / 9
4. अॅक्सिस मिड-कॅप फंड : हा म्युच्युअल फंड उच्च वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. त्याची AUM 13,834.27 कोटी आहे. गेल्या 5 वर्षात या फंडाने SIP वर 26.27 टक्के परतावा दिला आहे.
8 / 9
5. निप्पॉन इंडिया स्मॉल-कॅप फंड हा स्मॉल-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. जर तुम्ही थोडी जास्त जोखीम घेण्यास तयार असाल तर तुम्ही या फंडात गुंतवणूक करू शकता. गेल्या पाच वर्षांत या फंडाने SIP वर 28.22 टक्के परतावा दिला आहे.
9 / 9
(टीप: कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या)
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूकMONEYपैसा