शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Floating Rate Bond: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! या ठिकाणी गुंतवणूक केल्यास मिळेल सर्वाधिक व्याज, RBI ची मालामाल करणारी घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 9:09 AM

1 / 6
जर आपणही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी एक खास आणि आनंदाची बातमी आहे. केंद्रीय बँकेने ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. भारतीय रिझर्व बँकेने (RBI) 7 डिसेंबर, 2022 पासून 6 जून, 2023 पर्यंत लागू असलेल्या केंद्र सरकारच्या फ्लोटिंग रेट बॉन्ड, 2031 (FRB 2031) च्या व्याज दराची घोषणा केली आहे.
2 / 6
RBI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी हा व्याजदर 7.69 टक्के प्रति वर्ष असेल. आरबीआयने मंगळवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.
3 / 6
जाणून घ्या कसा निश्चित केला जातो व्याजदर? - आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे, 'हे लक्षात ठेवायला हवे, की एफआरबी, 2031 मध्ये एक कूपन असेल. ज्याचा बेस रेट 182 दिवसांच्या टी-बिल्सच्या (182 Day T Bills) मागील 3 ऑक्शनच्या (दर निश्चितीच्या दिवशी, म्हणजेच 7 डिसेंबर, 2022 रोजी) वेटेड अॅव्हरेज यील्ड (WAY) बोरोबरीत असेल. वेटेड अॅव्हरेज यील्डची गणना एका वर्षात 365 दिवसांच्या मोजणी द्वारे केली जाईल.'
4 / 6
फ्लोटिंग रेट बॉन्ड म्हणजे काय? फ्लोटिंग रेट बॉन्ड, अशा सिक्योरिटीजना म्हटले जाते, ज्यांवर कुठल्याही प्रकारचा फिक्स कूपन रेट अथवा व्याज दर नसतो. याचे केवळ एकाच प्रकारचे नाही, तर अनेक कूपन रेट असतात. जे प्रत्येक वेळी पूर्वनिर्धारित कालमर्यादेत पुन्हा सेट केले जातात.
5 / 6
कसा निर्धारित केला जातो दर? - आता प्रश्न असा की, याचा व्याज दर कसा निर्धारित केला जातो? तर, फ्लोटिंग रेट बॉण्डमध्ये 182-दिवसांच्या ट्रेझरी बिलांच्या (टी-बिल), शेवटच्या 3 लिलावांच्या वेटेड अॅव्हरेज यील्ड एवढे बेस रेटसह एक निश्चित कुपन असते. याशिवाय, लिलावाच्या माध्यमाने निश्चित केला गेलेला एक निश्चित स्प्रेड असतो.
6 / 6
सरकारी सिक्योरिटीजची स्थिती? - मंगळवारी अर्था 6 डिसेंबररोजी सरकारी सिक्योरिटीज बंद झाले आहेत. याच बरोबर, बॉन्ड यील्ड संदर्भात बोलायचे झाल्यास, ते मंगळवारी 7.2486% वर बंद झाले. तर मागील ट्रेडिंग सेशनमध्ये ते 7.2254% वर बंद हुआ झाले होते. खरे तर, आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची बैठक सुरू आहे. यामुळे, ट्रेडर्स RBI च्या कुठल्याही प्रकारच्या निर्णयापूर्वी अलर्ट मोडवर आहेत.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकInvestmentगुंतवणूकbankबँकCentral Governmentकेंद्र सरकार