शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Airtel पुन्हा देणार महागाईचा झटका! आता Prepaid Plans होणार महाग? जाणून घ्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 2:47 PM

1 / 7
टेलिकॉम कंपन्यांनी गेल्याच वर्षी Prepaid Plans चे दर वाढवले होते. आता पुन्हा एकदा टेलिकॉप कंपन्यात दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. Bharti Airtel चे सीईओ गोपाल विठ्ठल यांनी देखील दरवाढीचे संकेत दिले आहेत.
2 / 7
प्री-पेड प्लानच्या दरवाढीचं नवंपत्रक याच वर्षात येण्याची दाट शक्यता असल्याचं ते भारती एअरटेल या टेलिकॉम कंपनीचे सीईओ गोपाल विठ्ठल म्हणाले. दरम्यान, येत्या दोन ते तीन महिन्यात तरी एअरटेलचे प्री-पेड प्लान वाढणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
3 / 7
फक्त Airtel नव्हे, Vodafone Idea देखील त्यांच्या प्री-पेड प्लानमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे.
4 / 7
Vodafone Idea चे सीईओ रविंद्र ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्री-पेड प्लानमधील दरवाढीसाठी पुढील वर्षाची वाट पाहणं शक्य नाही. यंदाच्या वर्षातच प्री-पेड प्लानचे दर वाढ होणार असल्याच्या वृत्तावर त्यांनीही शिक्कामोर्तब केलं आहे. आता कंपन्या SIM consolidation बाबत खूप चिंतेत आहेत.
5 / 7
SIM consolidation मध्ये ग्राहक आपल्या मल्टीपल सिमकार्डला रिचार्ज करणं बंद करतात. पण त्यांनी सेवा पूर्णपणे बंद करणं गरजेचं असतं. तेव्हाच ग्राहकानं सेवा घेणं बंद केल्याचं ग्राह्य धरलं जातं. Airtel च्या म्हणण्यानुसार शॉर्ट टर्म रेव्हेन्यूवर युजरला २०० रुपयांवर आणण्याची इच्छा आहे. तर लाँग टर्ममध्ये हाच प्लान ३०० रुपये करण्याचा मानस आहे.
6 / 7
गोपाळ विठ्ठल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३०० रुपयांच्या पातळीवर पोहोचल्याविना भारती एअरटेलसारखी कंपनी १५ टक्क्यांच्या रिर्टन ऑन कॅपिटल एम्प्लॉईडपर्यंत पोहोचू शकत नाही. तज्ज्ञांच्या मतानुसार कंपन्या प्रीपेड प्लानमध्ये वाढ न केल्याशिवाय जास्तकाळ बाजारात टीकू शकत नाहीत. त्यामुळे प्रीपेड प्लानमध्ये दरवाढ होणं निश्चित आहे.
7 / 7
देशात आजही मोबाइल टॅरिफ खूप कमी आहे. त्यामुळे टेलिकॉम ऑपरेटर्सना समाधानकारक रिटर्न्स मिळत नाहीत. त्यामुळे या वर्षातही मोबाइल टॅरिफ प्लान्समध्ये दरवाढ झाल्यास त्याचं आश्चर्य बाळगायला नको, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
टॅग्स :AirtelएअरटेलVodafoneव्होडाफोन