bharti airtel will soon give free 2gb 4g data without any additional cost know offer details
Airtel युझर्ससाठी मोठी खुशखबर; कंपनी देणार मोफत 2GB 4G डेटा, असा घेऊ शकता फायदा By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 6:40 PM1 / 7जर तुम्ही भारती एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. सध्या कंपनी ग्राहकांना 2GB 4G डेटा मोफत देण्यावर विचार करत आहे. 2 / 7भारती एअरटेल (Bharati Airte) सध्या आपली जुनी स्कीम पुन्हा आणण्याच्या विचारात आहे, ज्यामध्ये ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त पैशांशिवाय 2GB मोफत डेटा देण्यात येत होता. परंतु यावेळी हा डेटा मिळवण्यासाठी युझर्सना काही काम करावं लागेल.3 / 7मोफत डेटाचा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांना एअरटेलनं भागीदारी केलेल्या कंपन्यांची निवडक उत्पादनं खरेदी करावी लागतील. भारती एअरटेल पेप्सिको इंडियासोबत सह-ब्रँडिंग कार्यक्रम पुन्हा सुरू करणार आहे. 4 / 7Airtel Lays, Uncle Chips, Doritos, Kurkure, Pepsi, Mountain Dew, 7UP, Tropicana यासारख्या उत्पादनांवर 2GB मोफत डेटा मोफत उपलब्ध असेल. पॅकेटवर एक कोड देण्यात येणार असून ज्याचा वापर करून तुम्हाला मोफत डेटा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला एअरटेलकडून 2GB बोनस डेटा हवा असेल तर तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता.5 / 7ईटी टेलिकॉमच्या अहवालानुसार, या आठवड्यात दोन्ही कंपन्यांमधील सह-ब्रँडिंग करार पुन्हा सुरू करण्यात येईल आणि 31 मार्च 2022 पर्यंत ही स्कीम सुरू राहणार आहे. या करारानुसार, एअरटेलच्या प्रीपेड सीम वापरणाऱ्या ग्राहकांना 2GB डेटा मोफत दिला जाईल. 6 / 7जेव्हा युझर त्यापैकी काही उत्पादने खरेदी करेल, तेव्हा त्याला तो डेटा वापरण्याची संधी मिळेल. अहवालानुसार, एअरटेलचे नाव अंकल चिप्स, कुरकुरे, लेज आणि डोरिटोस सारख्या उत्पादनांवर दिसेल. 7 / 7ही उत्पादने खरेदी करणाऱ्या युझर्सना पॅकेटमध्ये छापलेला 'फ्री डेटा व्हाउचर कोड' शोधावा लागेल. याव्यतिरिक्त, ग्राहकांना एअरटेल थँक्स अॅप्लिकेशनमधील 'माय कूपन' विभागात जाऊन पॅकेजिंगमधून मिळालेला कोड टाकावा लागणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications