शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बंद झाला Bharti Airtel चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान; आता खर्च करावे लागणार अधिक पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 4:06 PM

1 / 9
भारती एअरटेलनं आपल्या ग्राहकांना एक झटका दिला आहे. कंपनीनं ४९ रूपयांचा प्लान बंद करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
2 / 9
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलनं यापूर्वी काही टेलिकॉम क्षेत्रांमध्ये हा प्लान बंद केला होता.
3 / 9
परंतु आता २९ जुलै पासून ४९ रूपयांचा प्लान सर्वत्रच बंद करत असल्याची घोषणा कंपनीनं केली आहे.
4 / 9
हा एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान होता. हा प्लॅन बंद झाल्यानं ग्राहकांना आता किमान ७९ रूपयांच्या प्लॅननं रिचार्ज करावं लागणार आहे.
5 / 9
७९ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळणार आहे. तसंच यामध्ये ६४ रूपयांचा टॉकटाईमही मिळेल.
6 / 9
याव्यतिरिक्त कंपनी ग्राहकांना २०० एमबी डेटाही देत आहे. ग्राहतांना डबल डेटासह अधिक आऊटगोईंग मिनिटही ऑफर करण्यात येत आहेत. या प्लानमधील बदल हे २९ जुलैपासूनच लागू होणार आहेत.
7 / 9
भारती एअरटेलच्या सर्वात स्वस्त प्लॅनची किंमत आता ४९ रूपयांऐवजी ७९ रूपये इतकी झाली आहे. ७९ रूपयांचा प्लान ४९ रूपयांच्या प्लानच्या तुलनेत ३० रूपयांनी अधिक आहे.
8 / 9
परंतु या प्लॅनमध्ये ग्राहकांना दुप्पट डेटा आणि चौपट अधिक आऊटगोईंग कॉलिंग मिनिट्स देण्यात येत आहे. ७९ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांकडून कॉलिंगसाठी १ पैसा / सेकंद चार्ज करण्यात येतात.
9 / 9
या निर्णयामुळे कंपनीला आपला ARPU सुधारण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी एअरटेलनं एक गोष्ट स्पष्ट केली होती. कंपनीला कमी ARPU देणारे ग्राहक नको, असं सांगण्यात आलं होतं. याशिवाय कंपनीचं लक्ष्य २०० रूपये ARPU पर्यंत पोहोचण्याचं आहे.
टॅग्स :AirtelएअरटेलSmartphoneस्मार्टफोनInternetइंटरनेट