शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vodafone-Idea ला मोठा झटका; मोठ्या प्रमाणात घटली ग्राहकांची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 1:32 PM

1 / 10
Reliance Jio नं दूरसंचार क्षेत्रात घेतलेल्या एन्ट्रीपासून बाजारावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. अवघ्या काही वर्षांतच इतक्या वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रात तग धरून असलेल्या कंपन्यांना मागे टाकत रिलायन्स जिओनं देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी होण्याचाही मान पटकावला.
2 / 10
रिलायन्स जिओला पुन्हा एकदा मोठं यश मिळालं आहे, रिलायन्स जिओनं सलग दुसऱ्या महिन्यात Airtel आणि Vodafone-Idea या कंपन्यांना मागे टाकलं आहे. रिलायन्स जिओनं या वर्षी जून महिन्यात ५४.७ लाख नवे सबस्क्रायबर्स आपल्या सोबत जोडले.
3 / 10
तर दुसरीकडे एअरटेलनं ३८,१ लाख नवे सबस्क्रायबर्स आपल्यासोबत जोडले. तर दुसरीकडे व्होडाफोन आयडियाला मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात ग्राहक व्होडाफोन आयडिला सोडून गेल्याचं या आकडेवारीतून दिसून येत आहे.
4 / 10
एकीकडे आर्थिक संकटात सापडलेल्या व्होडाफोन आयडिला इतक्या मोठ्या प्रमाणात ग्राहक सोडून जात आहेत. त्यामुळे आणखी एक फटका कंपनीला बसताना दिसत आहे. इकॉनॉमिक टाईम्सनं टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरीटी ऑफ इंडियाच्या (TRAI) नव्या डेटाच्या आधारे ही माहिती दिली.
5 / 10
मे महिन्यात वायरलेस सबस्क्रायबर्सची एकूण संख्या ११७६४.८४ दशलक्ष इतकी होती. जी जून २०२१ या महिन्यात वाढून ११८०.८३ दशलक्ष झाली. सबस्क्रायबर्सच्या संख्येत ०.३४ टक्क्यांची मंथली ग्रोथ पाहायला मिळाली.
6 / 10
ट्रायच्या डेटानुसार मे २०२१ च्या अखेरीस शहरातील वायरलेस सबस्क्रायबर्सची संख्या ६४१.४८ दशलक्ष इतकी होती, जी जून महिन्यात वाढू ६४६.२९ दशलक्ष इतकी झाली.
7 / 10
परंतु ग्रामीण भागातील वायरलेस सबस्क्रिप्शनमध्ये घट झाली. मे महिन्यात ही संख्या ५३५.३६ दशलक्ष इतकी होती. जून महिन्यात ती कमी होऊन ५३५.५४ दशलक्ष इतकी झाली.
8 / 10
वायरलेस सेगमेंटमध्ये सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आणि MTNL चा दबदबा होता. या सेगमेंटमध्ये त्यांचा हिस्सा ४७.६० टक्के इतका होता. कतर दुसरीकडे वायरलेस सबस्क्रायबर्स मार्केटमध्ये खासगी कंपन्यांचा दबदबा होता.
9 / 10
खासगी कंपन्यांचा यात संयुक्त हिस्सा ८०.९५ टक्के इतरा होता. या सेगमेंटमध्ये एमटीएनएल आणि बीएसएनएलचा हिस्सा १०.०५ टक्के होता.
10 / 10
जून २०२१ मध्ये १२२.७ लाख ग्राहकांना मोबाईल नंबर पोर्टेबलिटीसाठी (MNP) रिक्वेस्ट दिली. एमएनपी टोटल रिक्वेस्ट वाढून ६०५.८८ दशलक्षावर पोहोचली. जी मे २०२१ च्या अखेरिस ५९३.६१ दशलक्ष इतकी होती.
टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाReliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायIndiaभारत