शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala : ज्या शेअरनं झुनझुनवालांना बनवलं ‘बिग बुल’, त्यानंच बुडवले ३५०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 7:57 PM

1 / 6
Rakesh Jhunjhunwala Portfolio stock: शेअर बाजारातील 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांना स्वतःच्या आवडत्या स्टॉकमधून मोठा तोटा सहन करावा लागत आहे. या स्टॉकने राकेश झुनझुनवाला यांना कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावं लागलंय. एक काळ असा होता की राकेश झुनझुनवाला यांना या स्टॉकमधून विशेष ओळख मिळाली.
2 / 6
या स्टॉकचे नाव आहे- टायटन. टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओचा प्रमुख स्टॉक बीएसईवर 6 टक्क्यांनी घसरून 1,936.55 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला.
3 / 6
गेल्या तीन महिन्यांत टाटा समूहाची कंपनी टायटनमध्ये राकेश झुनझुनवाला यांना सुमारे 3,500 कोटी रुपयांचा तोटा झाला. कारण या कालावधीत या स्टॉकच्या किंमतीत 29 टक्क्यांची घसरण झाली. 17 मार्च 2022 पासून झुनझुनवालांच्या टायटन कंपनीतील होल्डिंगची किंमत 3,489 कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
4 / 6
शेअरने 1,925 रुपयांच्या नऊ महिन्यांतील नीचांकी पातळी गाठली आणि शुक्रवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये BSE वर 7 टक्क्यांनी घसरला. 21 मार्च रोजी 2767.55 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावरून हा स्टॉक 31 टक्क्यांनी खाली आला आहे. 20 जुलै 2021 रोजी तो 1,661 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.
5 / 6
2003 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीत गुंतवणूक केली होती. त्यांनी या कंपनीत केलेली गुंतवणूक त्यांचं नशीब पालटणारीही ठरली होती. त्यांनी या कंपनीचे ६ कोटी शेअर्स ३ रूपयांनी खरेदी केले होते.
6 / 6
देशांतर्गत ब्रँडेड ज्वेलरी मार्केटमध्ये (तनिष्क, कॅरेटलेन, झोया आणि मिया सारख्या ब्रँडसह) आणि देशांतर्गत घड्याळ विभागात (टायटन, सोनाटा, फास्ट्रॅक आणि झिल्स सारख्या ब्रँडसह) टायटन हे बाजारपेठेत आघाडीवर आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजार