शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

1 जुलैपासून नियमांत मोठे बदल! आता आधारद्वारे घरबसल्या सुरू करता येणार स्वत:ची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 5:33 PM

1 / 10
नवी दिल्ली : आता 1 जुलैपासून नवीन कंपनीची सुरुवात करणे खूप सोपे होणार आहे. घरी बसूनच आधारद्वारे कंपनीची नोंदणी करता येऊ शकते. सेल्फ डिक्लरेशन (स्वयं-घोषणा) च्या आधारे सरकारने कंपनीच्या ऑनलाइन नोंदणीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
2 / 10
नवीन मार्गदर्शक तत्त्वे 1 जुलै 2020 पासून लागू होणार आहेत. सध्या कंपनीची नोंदणी करण्यासाठी अनेक प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागतात. पोर्टलची माहिती 1 जुलै 2020 पूर्वी सार्वजनिक केली जाईल.
3 / 10
1 जून 2020 रोजी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने गुंतवणूक आणि व्यवसायावर आधारित एमएसएमईच्या वर्गीकरणासाठी नवीन निकषांना अधिसूचित केले होते. नवीन नियम 1 जुलै 2020 पासून लागू होणार आहेत.
4 / 10
ET मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार एंटरप्राइझ नोंदणी प्रक्रिया आयकर आणि जीएसटी प्रणालींसह एकत्र करणे शक्य आहे. एका अधिकाऱ्याच्या मते, जी काही माहिती दिली जाईल, त्यांची पडताळणी खाते क्रमांक (पॅन नंबर) आणि जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर (जीएसटीआयएन) द्वारे करता येणार आहे.
5 / 10
अधिसूचनेनुसार आता सूक्ष्म, लहान आणि मध्यम (एमएसएमई) युनिट एंटरप्राइझ म्हणून ओळखल्या जातील. हा शब्द उपक्रम शब्दाच्या जवळ आहे. त्याचप्रमाणे, नोंदणी प्रक्रियेला आता 'एंटरप्राइझ नोंदणी' म्हटले जाईल.
6 / 10
पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, 'प्लांट, यंत्रसामग्री किंवा उपकरणे' आणि 'व्यवसाय' मधील गुंतवणूक ही आता एमएसएमईच्या वर्गीकरणासाठी मूलभूत निकष आहेत.
7 / 10
आता कोणत्याही एंटरप्राइझच्या उलाढालीची गणना करताना वस्तू किंवा सेवांची निर्यात किंवा त्या दोघांची उलाढाल मोजून वगळली जाईल, संबंधित उपक्रम सूक्ष्म किंवा लहान किंवा मध्यम असोत.
8 / 10
एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की आधार क्रमांकाच्या आधारे एंटरप्राइझ नोंदविली जाऊ शकते. कोणताही तपशील अपलोड किंवा सबमिट न करता स्वयंघोषणाच्या आधारे इतर तपशील दिले जाऊ शकतात. अशा प्रकारे, कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
9 / 10
ज्यांच्याकडे अद्याप वैध आधार क्रमांक नाही, ते एकाच विंडो सिस्टमवर आधार नोंदणी विनंती अर्ज किंवा बँक फोटो पासबुक, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स देखील वापरू शकतात आणि नोंदणीसाठी अर्ज करू शकतात.
10 / 10
एमएसएमईच्या वर्गीकरण, नोंदणी आणि सोयीची नवीन प्रणाली संपूर्ण जगात एक अतिशय सोपी आणि वेगवान असेल. व्यवसाय करणे सुलभतेच्या दिशेने जाणारे हे एक क्रांतिकारक पाऊल असेल, असे एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डtechnologyतंत्रज्ञान