Big decision of oil producing countries now petrol diesel will be cheaper in India
तेल उत्पादक देशांचा मोठा निर्णय, आता भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 9:13 AM1 / 8ओपेक प्लस (OPEC+) देशांनी सध्याच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात कोणत्याही पद्धतीचा बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये कच्च्या तेलाची घटती मागणी पाहता ओपेक प्लस देश कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याची शक्यता वर्तवली जात होती. 2 / 8२३ देशांच्या संघटनेनं ऑक्टोबर महिन्यात दैनंदिन पातळीवर दोन मिलियन बॅरल इतकी मोठी घट करण्याचा निर्णय घेतला होता. ही घट यापुढेही कायम राहणार आहे. पण यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत नेमका किती फरक पडेल याची स्पष्टता अद्याप आलेली नाही. 3 / 8चीन सरकारच्या झीरो कोविड पॉलीसीमुळे देशातील उद्योग प्रभावित झाले आहेत. ज्यामुळे देशाताली कच्च्या तेलाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. यामुळे जागतिक पातळीवरही कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीन जगातील सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. 4 / 8युरोपियन संघ आणि जी-७ देशांनी रशियाच्या तेलावर प्रतिबॅरल ६० डॉलर इतकी किंमत लागू करण्यास सहमती दाखवलेली असतानाच कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट न करण्याचा हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रिपोर्टनुसार सोमवारी ५ डिसेंबरपासून हा निर्णय लागू होणार आहे. 5 / 8युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकासह पाश्चिमात्य देशांनी रशियावर विविध निर्बंध लादले आहेत. आता रशियाच्या तेलावर प्राइस कॅप लावून देशाला आर्थिक पातळीवर कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. तेलाच्या निर्यातीतून रशिया प्रचंड कमाई करणारा देश आहे. 6 / 8रॉयटर्सच्या माहितीनुसार रशियासह सहयोगी देशांनी ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाच्या उत्पादनात प्रतिदीन दोन मिलियन बॅरलची घट करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे अमेरिकासह इतर पाश्चिमात्य देश नाराज झाले होते. ओपेक प्लस देशांनी लागू केलेली ही कपात जागतिक मागणीच्या दोन टक्के इतकी आहे. 7 / 8ओपेक प्लस देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट केल्याच्या निर्णयाचं मुख्य कारण आर्थिक स्थित असल्याचं मानलं जात आहे. चीनमधील कच्च्या तेलाच्या मागणीची घट, सुस्त जागतिक विकास दर आणि उच्च व्याजदरांमुळे ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीतही घट झाली. ऑक्टोबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव गेल्या १० महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर पोहोचला होता. 8 / 8आंतरराष्ट्रीय बाजारात बऱ्याच कालावधीपासून कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातच इंडियन ऑइल, बीपीसीएल-एचपीसीएल सारख्या तेल मार्केटिंग कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसएमसी ग्लोबलच्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या दरात एक डॉलरची घसरण झाली की भारतीय तेल कंपन्यांच्या रिफायनिंगवर ४५ पैसे प्रतिलीटर इतकी बचत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications