Big drop in gold and silver prices, the lowest level of the month Know the price of 10 grams of gold
Gold Price Today: मोठी संधी! सोन्याचा दर महिनाभरातील सर्वाधिक नीचांकी पातळीवर, जाणून घ्या लेटेस्ट दर By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2021 8:29 PM1 / 9सोन्याचा आजचा दर महिन्याभरातील सर्वात नीचांकी पातळीवर आला आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे १९६ रुपयांनी कमी झाला आहे. 2 / 9चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळत आहे. एक किलो चांदीची किंमत ६३ हजार रुपये इतकी आली आहे. 3 / 9अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर कमी होत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सोन्याच्या दरात आणखी घसरण झालेली पाहायला मिळू शकते. 4 / 9देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी ४३ हजारांपर्यंत खाली येऊ शकतात असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस येणार आहेत. 5 / 9दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममागे १९६ रुपयांची घट नोंदविण्यात आली असून ४५ हजार ९५२ रुपये इतका दर आहे. 6 / 9आंतरराष्ट्रीय बाजारतही सोन्याच्या किमतीत घसरण झालेली पाहायला मिळत आहे. बाजारातील किंमत प्रति औंस १८०० डॉलरच्या खाली गेली आहे. 7 / 9चांदीच्या दरात आज तब्बल ८३० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहेय चांदीचा आजचा दर प्रतिकिलो ६२ हजार ७१५ रुपयांवर आला आहे. याआधी हाच दर ६३ हजार ५४५ रुपये इतका होता. 8 / 9सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं देखील फायदेशीर ठरणारं आहे. दरमहा १ हजार रुपये एसआयपीच्या माध्यमातून गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला तुम्ही सुरुवात करू शकता. 9 / 9गोल्ड म्युच्युअल फंडात ३ वर्षांपेक्षा अधिक काळासाठी गुंतवणूक करणं दीर्घकाळ गुंतवणूक म्हणून समजलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications