शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IPOची धडाकेबाज लिस्टिंग: पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, आमिर-रणवीरनेही घेतली मोठी रिस्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 8:46 PM

1 / 6
Blockbuster IPO: ड्रोनआचार्य इनोव्हेशन्स (DroneAcharya AI) च्या इनिशीअल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ (IPO) ची आज दमदार सुरुवात झाली. कोसळणाऱ्या शेअर बाजारातही या कंपनीच्या शेअर्सची जबरदस्त लिस्टिंग झाली आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे डबल झाले.
2 / 6
शुक्रवारी बीएसई एसएमई (BSE SME) मध्ये लिस्टेड या ड्रोन स्टार्टअपने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना सूमारे 100% फायदा करुन दिला. विशेष म्हणजे, ही ड्रोन स्टार्टअप कंपनी दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांची आहे. शंकर शर्मांना आज 100% लिस्टिंग गेन झाले आहे. यासोबतच बॉलिवूड स्टार आमिर खान आणि रणबीर कपूरचेही पैसे दुप्पट झाले आहेत. आमिर आणि रणबीरने या स्टार्टअप कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे.
3 / 6
शंकर शर्मा यांच्याकडे या कंपनीचे 4.57 लाख शेअर्स आहेत. त्यांनी या कंपनीत सूमारे 2.45 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, आजच्या ब्लॉकबस्टर लिस्टिंगनंतर त्यांचे पैसे 4.89 कोटी झाले आहेत. आज कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर 107.10 रुपयांवर व्यवहार करत होते. याच्या इश्यू प्राइस 54 पेक्षा 98.33% अधिक.
4 / 6
या वर्षाच्या सुरुवातीला प्रीआयपीओ फंड गोळा करताना आमिर खानने यात 25 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याबदल्यात आमिरला ड्रोनआचार्यचे 46,600 शेअर मिळाले. तसेच, रणबीर कपूरने 20 लाख रुपयांमध्ये 37,200 शेअर खरेदी केले. सर्व माजी-आयपीओ गुंतवणूकदारांसाठी या शेअरची किंमत 53.59 रुपये ठेवण्यात आली होती.
5 / 6
पुण्यातील या ड्रोन स्टार्टअप कंपनीला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या आयपीओला ओव्हरसब्सक्राइब करण्यात आले. तीन दिवसात 262 टक्के सब्सक्रिप्शन मिळाले आहे. सर्वात जास्त याच्या रिटेल भागाला 330 टक्के अधिक सब्सक्राइब केले आहे.
6 / 6
DroneAcharya AI 2022 मध्ये DGCA (नागरी उड्डयन महासंचनालय Directorate General of Civil Aviation) सर्टिफाइड RPTO (रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन) लायंसेंस मिळवणारी पहिली खासगी कंपनी आहे. मार्च 2022 पासून कंपनीने 200 पेक्षा अधिक ड्रोन पायलट्सना प्रशिक्षित केले आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकRanbir Kapoorरणबीर कपूरAamir Khanआमिर खान