SBI मध्ये सॅलरी अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; मोफत मिळतील हे 5 मोठे फायदे! By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 3:50 PM
1 / 8 नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (state bank of india) आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा देण्यात येतात. जर तुम्ही या सरकारी बँकेत तुमचे सॅलरी अकाऊंट उघडले असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेकडून सॅलरी अकाऊंट उघडणाऱ्या ग्राहकांना खास सुविधा देण्यात येत आहे. 2 / 8 स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सॅलरी अकाऊंट असणाऱ्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज (Personal Loan), वाहन कर्ज (Vehicle Loan), शैक्षणिक कर्ज (Educational Loan) इत्यादींवर सवलत मिळते. याशिवाय, काही अन्य फायदे देखील आहेत जे खातेधारकांना माहित असणे आवश्यक आहेत. 3 / 8 1. अॅक्सिडेंट डेथ कव्हर (Accidental death cover)- SBI सॅलरी अकाउंट खातेधारकाला 20 लाख रुपयांपर्यंत अक्सिडेंटर कव्हर मिळेल. याअंतर्गत कोणत्याही अपघातात खातेधारकाचा मृत्यू झाल्या 20 लाखांपर्यंत कव्हर मिळेल. 4 / 8 2. एअर अॅक्सिडेंटल डेथ कव्हर (Air accidental death cover)- एसबीआयच्या वेबसाइटनुसार, हवाई प्रवासाती दुर्घटनेतील मृत्यू प्रकरणी सॅलरी अकाउंट खातेधारकाला एअर अॅक्सिडेंटल इन्शुरन्स (डेथ) कव्हर अंतर्गत 30 लाख रुपयांचा इन्शुरन्स मिळेल. 5 / 8 3. लोन प्रोसेसिंग फीवर 50 टक्के सूट (50% rebate in loan processing fee)- SBI अकाउंट खातेधार कोणतंही लोन जसं की वैयक्तिक कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज इत्यादीच्या प्रोसेसिंग फीवर 50 टक्के सूट मिळेल. 6 / 8 4. ओव्हरड्राफ्ट सुविधा (Overdraft facility)- ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा एसबीआय सॅलरी अकाउंट होल्डर्सना घेता येईल. तुम्हाला या सुविधेअंतर्गत दोन मगिन्याच्या सॅलरीइतकी रक्कम मिळू शकते. 7 / 8 5. लॉकर चार्जमध्ये सूट (Rebate in locker charges) SBI त्यांच्या सॅलरी अकाउंट होल्डर्सना लॉकर चार्जमध्ये 25 टक्के सूट प्रदान करते. 8 / 8 या व्यतिरिक्त ग्राहकांना SMS अलर्ट, फ्री ऑनलाईन NEFT/RTGS,कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये फ्री अनलिमिटेड ट्रान्जक्शन, मल्टी सिटी चेक यासारख्या सुविधा मिळतात. आणखी वाचा