शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आतापर्यंत ITR न भरता आलेल्यांसाठी मोठी बातमी, पाहा काय आहे अर्थ मंत्रालयाची ही अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 9:31 AM

1 / 7
ITR Deadline News: आयकर रिटर्न भरण्याची अखेरची तारीख निघून गेली आहे. आयकर विभागानं 31 जुलै 2023 ही अखेरची तारीख निश्चित केली होती. परंतु अजूनही अनेक लोक आहेत जे त्यांचे आयकर रिटर्न भरू शकलेले नाहीत. मात्र, असे लोक अजूनही आयकर रिटर्न भरू शकतात.
2 / 7
यासाठी लोकांना एक प्रक्रिया अवलंबावी लागेल. जर लोकांनी 2022-23 या आर्थिक वर्षातील त्यांची कमाई जाहीर केली नसेल, तर त्यांना आता विलंब शुल्क भरून आयकर रिटर्न भरता येईल. यासाठी देखील एक तारीख निश्चित करण्यात आलीये. यानंतर तुम्हाला संधी मिळणार नाही.
3 / 7
जे करदाते 31 जुलैपर्यंत ITR दाखल करू शकत नाहीत ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत त्यांचे रिटर्न दाखल करू शकतील. अशा फाइलिंगवर, ज्यांचं निव्वळ करपात्र उत्पन्न वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा पगारदार कर्मचाऱ्यांकडून 5,000 रुपयांपर्यंत विलंब शुल्क आकारलं जाईल. याशिवाय 5 लाख रुपयांपेक्षा कमी करपात्र उत्पन्न असलेले लोक 1000 रुपयांच्या दंडासह आयटीआर दाखल करू शकतात.
4 / 7
आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार असेसमेंट इयर 2023-24 साठी सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6.50 कोटीहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले. करदात्यांना शेवटच्या दिवशी ऑनलाइन आयकर रिटर्न भरण्यात कोणतीही अडचण आली नसल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे.
5 / 7
सोमवारी अखेरच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 37 लाख लोकांनी आयकर रिटर्न भरले. विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा परतावाही ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. जसजसे इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केले जात आहेत, तसं त्याचं मूल्यांकनही केलं जात आहे.
6 / 7
अशा परिस्थितीत ज्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत त्यांना ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून रिफंड मिळण्यास सुरुवात होईल. ऑगस्टअखेर परतावा देण्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
7 / 7
अशा परिस्थितीत ज्यांनी आयकर रिटर्न भरले आहेत त्यांना ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून रिफंड मिळण्यास सुरुवात होईल. ऑगस्टअखेर परतावा देण्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सMONEYपैसाGovernmentसरकार