Big news! Google Pay will charge on money transfer from January 1
मोठी बातमी! Google Pay नववर्षात दणका देणार; 1 जानेवारीपासून चार्ज आकारणार By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 9:21 AM1 / 10जर तुम्ही गुगल पेचे युजर असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवरील पेमेंट सुविधेत गुगल पे अव्वल आहे. मात्र, आता ही कंपनी आपल्या युजरना मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. 2 / 10Google Pay पुढील वर्षापासून पीयर टी पीयर पेमेंट सुविधा बंद करणार आहे. या बदल्यात कंपनी इन्स्टंट मनी ट्रान्सफर पेमेंट सिस्टिम लागू करणार आहे. यासाठी युजरला चार्ज द्यावा लागणार आहे. 3 / 10गुगलने अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सध्या ग्राहक गुगल पे अॅप आणि pay.google.com अशा दोन्ही प्लॅटफॉर्मद्वारे ट्रान्झेक्शन करतात. 4 / 10गुगलने एक नोटीस जारी करून युजरना माहिती दिली आहे. यामध्ये पुढील वर्षी जानेवारीपासून वेब पेमेंट सर्व्हिस काम करणार नाही. म्हणजेच बंद केली जाणार आहे. 5 / 109to5Google च्या रिपोर्टनुसार 2021 च्या सुरुवातीपासूनच युजर pay.google.com वरून पैसे पाठवू शकणार नाहीत. पैसे ट्रान्सफर करण्यासाठी त्यांना गुगल पेचा वापर करावा लागणार आहे. 6 / 10म्हणजेच गुगल Pay.google.com सुविधा बंद करणार आहे. या बदल्यात कंपनी नवीन पेमेंट अॅप आणण्याच्या तयारीत आहे. 7 / 10गुगल पेचा सुरुवातीपासूनचा लोगो बदलला जाणार आहे. यामुळे फसायला होण्याची चिन्हे आहेत. कारण त्यावर आता जी हे अक्षरच नसणार असून यु आणि एनचा मिलाप असणार आहे. हे अॅप अमेरिकेत रोलआऊट करण्यात आले आहे. 8 / 10अशातच गुगल पुढील वर्षापासून इन्स्टंट मनी ट्रान्सफर चार्ज वसूलनार आहे. जर असे झाले तर तो ग्राहकांसाठी मोठा झटका असणार आहे. 9 / 10आज भारतात गुगल पे हे नंबर एकचे अॅप आहे. तर जगभरातही कोट्यवधी लोक हे अॅप वापरतात. यामुळे या साऱ्या ग्राहकांना हा चार्ज द्यावा लागणार आहे. हा चार्ज किती असेल ते मात्र अद्याप समजलेले नाही. 10 / 10गुगलच्या म्हणण्यानुसार जेव्हा तुम्ही बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करता तेव्हा त्यासाठी एक ते तीन दिवस लागतात. डेबिट कार्डाद्वारे लगेचच पैसे वळते होतात. यासाठी 1.5 टक्के किंवा 0.31 डॉलर चार्ज आकारला जातो. अशाचप्रकारे गुगलही चार्ज वसूल करण्याची शक्यता आहे. सध्यातरी गुगलच्या सेवा फ्री आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications