शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹15 च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 12:41 PM

1 / 8
देशात मोदी 3.0 सरकार आणि सरकारमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा जनता दल यूनाइटेड (जेडीयू) प्रमुख भागीदार, असे समिकरण झाल्यानंतर, आता बिहारमधील आदित्य व्हिजन कंपनी फोकसमध्ये आहे. गेल्या एका वर्षात 200 टक्क्यांचा परतावा देणाऱ्या या कंपनीच्या मल्टीबॅगर शेअरवर दलाल स्ट्रीट बुल्सची नजर आहे.
2 / 8
या कंपनीचा शेअर सध्या 3,833 रुपयांवर आहे. एनएसईवर जून 2024 मध्ये आदित्य व्हिजनचा शेअर साधारणपणे ₹3200 वरून आजच्या किंमतीवर आला आहे. अर्थात या कालावधीत या शेअमध्ये जवळपास 20 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
3 / 8
काय म्हणतायत एक्सपर्ट्स - प्रॉफिटमार्ट सिक्युरिटीजचे रिसर्च प्रमुख अविनाश गोरक्षकर यांनी म्हणाले आहे की, 'आदित्य व्हिजन ही एक बिहारमधील कंपनी आहे. आणि केंद्रात मोदी 3.0 सरकार आल्याने आशीष कचोलिया यांच्या या पोर्टफोलिओ स्टॉकमध्ये तेजी येत आहे.
4 / 8
महत्वाचे म्हणजे, बिहारचे मुख्यमत्री नितीश कुमार यांनी बिहारला 'विशेष राज्याचा दर्जा' देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. यामुळे हे, मल्टीबॅगर स्टॉकमधील वृद्धीचे अल्पकालिक कारण असू शकते, गोरक्षकर यांनी म्हणाले आहे
5 / 8
अशी आहे शेअरची स्थिती - आदित्य व्हिजनचे शेअर्स एका वर्षात जवळपास 200 टक्क्यांनी वधारले आहेत. गेल्या पाच वर्षांत हा शेअर तब्बल 6,300 टक्क्यांनी वाधारला आहे.
6 / 8
2016 पासून आत्तापर्यंत या शेअरने तब्बल 25,000% चा परताव दिला आहे. या काळात हा शेअर 15 रुपयांवरून आजच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे.
7 / 8
या कालावधीत एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आजपर्यंत कायम ठेवली असती, तर आता तीचे 2 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाले असते.
8 / 8
(टीप येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजारMONEYपैसा