वेदांताच्या अग्रवालांची लव्हस्टोरी! राजेश खन्नाला भेटविण्याचे सांगितले अन् १५ वर्षांच्या मुलीसोबत लग्न केले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:47 IST
1 / 9जगभरात व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेमाचा सप्ताह सुरू आहे. ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. आज या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवसाच्या निमित्ताने महान प्रेमकथांची आठवण काढली जाते. आपणही अशाच एक लव्ह स्टोरीविषयी जाणून घेणार आहोत. ही प्रेमाची गोष्ट आहे, वेदांत ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल आणि त्यांची पत्नी किरण याची. त्यांच्या प्रेमकथेत थेट बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांचं पात्र आहे.2 / 9अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात ते मुंबईत राहत होते. त्या काळात लहान वयातच लग्न केले जायचे. त्याप्रमाणे माझंही लग्न ठरवलं गेलं. साखरपुडा पार पडला. त्यापूर्वी आम्ही दोघे (मुलगा आणि मुलगी) कधीच भेटलो नव्हतो. मात्र, कुटुंबीयांनी सांगितले की, १५ वर्षांच्या किरणला राजेश खन्ना खूप आवडतो. अशा परिस्थितीत मला मुंबईत राहण्याचा फायदा झाला. मीही राजेश खन्ना यांची भेट करुन देतो, असं सांगून नात्यात पुढे गेलो. यावेळी त्यांनी आपल्या पहिल्या उत्कंठावर्धक भेटीचा किस्सा सांगितला.3 / 9'किरण आणि मी अनेक चित्रपट एकत्र पाहिले आहेत. पण राजेश खन्ना यांचा 'राजा रानी' आम्हाला अजूनही आठवतो, जो आम्ही पाटण्याच्या अशोक टॉकीजमध्ये पाहिला होता. त्यावेळी लग्नापूर्वी मुलगी-मुलगी भेटू शकत नव्हते. अशा परिस्थितीत जन्माष्टमीच्या मुहूर्तावर त्यांना किरणला भेटण्याची संधी मिळाली.4 / 9अनिल अग्रवाल यांच्या आईने जन्माष्टमीचा प्रसाद किरण यांच्या घरी पोहचवण्याची जबाबदारी त्यांचा धाकटा भाऊ नवीन याच्यावर सोपावली. पण अनिल अग्रवाल यांना स्वतः किरणला प्रसाद द्यायचा होता. त्या दिवशी किरणचे कुटुंब बाहेर गेले होते आणि घरी फक्त किरण आणि तिचा मोठा भाऊ होते हे त्यांना माहीत होते. याच संधीचा फायदा उचलण्याचे अनिल यांनी ठरवले. पण, किरण यांना भेटण्याचा पर्याय इतका सोपा नव्हता. कारण, धाकटा भाऊ मी जाणार म्हणून अडून बसला होता.5 / 9अनिल यांना नवीनचा वीक पॉइंट माहिती होता. त्यांनी त्याला पंतग घेऊन देण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला आईच्या भीतीने नवीनने नकार दिला. पण इतक्या पैशांत अनेक नवीन पतंग विकत घेण्याच्या लोभामुळे त्याने होकार दिला. आणि प्रसादाचा डबा अनिल यांच्या हातात आला.6 / 9अनिल पुढे म्हणाले, की धाकट्या भावाला गंडवलं याचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण, आता किरण आणि माझ्यामधे मेहुणा उभा होता. अनिल अग्रवाल किरणच्या घरी पोहोचल्यावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, पण किरणला भेटू दिले नाही. ते निराश होऊन तेथून निघून गेले, पण काहीतरी विचार करुन माघारी फिरले. 7 / 9मेहुणा ओमजी यांना पत्ते खेळण्याची खूप आवड होती हे त्यांना माहीत होते. लगेच त्यांनी सुत्र फिरवली. आपल्या मित्रांना फोन करुन मेहुणा ओमजी यांना पत्ते खेळण्यासाठी बोलवून घेण्यास सांगितले. तोपर्यंत सायंकाळी साडेसहा वाजता अशोक टॉकीटमध्ये चित्रपट पाहण्यासाठी भेटू असा निरोप त्यांनी किरण पर्यंत पोहचवला.8 / 9अनिल अग्रवाल यांनी सांगितले की, ते त्यांच्या मामाची फोर्ड कार घेऊन किरणच्या घरामागील मिठाईच्या दुकानात त्यांची वाट पाहू लागले. किरण सगळ्यांची नजर चुकवून मागच्या दारातून बाहेर आली आणि घाबरून गाडीत बसली. अनिल अग्रवाल पुढे म्हणाले की आजही मला ते घाबरलेले डोळे आठवतात. अखेर किरणसोबतचा त्यांनी 'राजा रानी' चित्रपट पाहिलाच.9 / 9अनिल अग्रवाल यांचा जन्म १९५४ मध्ये पाटणा येथे झाला. त्यांचे बालपणही तिथेच गेले. सरकारी शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. त्यांनी १९७० मध्ये स्क्रॅप मेटलचे काम सुरू केले. आज ते लंडनमध्येही आपला व्यवसाय चालवत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल अग्रवाल यांची वैयक्तिक संपत्ती १६५०० कोटी रुपये आहे. त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ३२००० कोटी रुपयांहून अधिक आहे.