शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बिस्लेरी, मुलगी आणि वाद; अँजेलो जॉर्जकडे गेली कंपनीची जबाबदारी, जयंतीशी वडिलांचे मतभेद..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 4:34 PM

1 / 6
Bisleri News: देशातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर कंपनी बिस्लेरी (Bisleri) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आधी टाटा ग्रुपसोबतचा करार झाल्याच्या आणि नंतर करार तुटल्याच्या बातम्या चर्चेत होत्या. त्यानंतर या 7000 कोटी रुपयांच्या कंपनीचा वारसदार कोण होणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या. टाटासोबतचा करार तुटल्यानंतर कंपनीचे मालक रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान (Jayanti Chauhan) यांनी कंपनीची जबाबदारी घेण्यास होकार दिल्याचे बोलले जात होते, मात्र मंगळवारी जयंतीऐवजी बिसलरीची जबाबदारी सीईओ अँजेलो जॉर्ज (Angelo George) यांच्याकडे देण्यात आली.
2 / 6
कोण आहेत अँजेलो जॉर्ज? अँजेलो जॉर्ज हे बिस्लेरी इंटरनॅशनलचे सीईओ आहेत. FMCG, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि फार्मास्युटिकल क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांमध्ये जवळपास तीन दशके काम करण्याचा अनुभव असलेले अँजेलो 2019 मध्ये बिस्लेरीमध्ये रुजू झाले. अँजेलो यांनी चेन्नईच्या ख्रिश्चन कॉलेजमधून पदवी घेतली आणि त्यानंतर बंगळुरू विद्यापीठातून पीजीडीएम केले. यासोबतच अँजेलोने शिकागोच्या ISB Hyd आणि Kellogg School of Management मधून Advanced Global Management Program देखील केला.
3 / 6
या कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या अँजेलो जॉर्ज यांच्या कारकिर्दीकडे पाहता, त्यांनी बोह्रिंजर-नॉल या मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीसोबत कार्डियाक आणि मधुमेह संशोधन क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. यानंतर, हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये जवळपास 20 वर्षे काम केले आणि विक्रीपासून ते व्यापार विपणन विभागापर्यंतच्या प्रमुख जबाबदाऱ्या हाताळल्या. यादरम्यान त्यांनी कंपनीत अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.
4 / 6
पाण्याच्या बाजारपेठेत बिस्लेरीचा 31% हिस्सा हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये बराच काळ घालवल्यानंतर अँजेलो जॉर्ज इमामी लिमिटेडमध्ये सामील झाले आणि त्यांनी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले. यानंतर जून 2019 मध्ये अँजेलोने बिस्लेरी इंटरनॅशनलसह आपली नवीन इनिंग सुरू केली आणि अजूनही सुरू आहे. आता त्यांना बिस्लेरीची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. बिस्लेरीचा भारताच्या पॅकेज्ड वॉटर मार्केटमध्ये सुमारे 31 टक्के वाटा आहे. भारतात बाटलीबंद पाण्याची बाजारपेठ सुमारे 20 हजार कोटी रुपयांची असून, यामध्ये बिस्लेरीचा वाटा अंदाजे 4000 ते 5000 कोटी रुपये इतका आहे.
5 / 6
बिसलरीचे देशात 122 ऑपरेशनल प्लांट 1969 पासून कंपनीची धुरा आपल्या हातात घेतलेल्या 82 वर्षीय रमेश चौहान यांनी गेल्या वर्षी वृद्धापकाळामुळे आणि उत्तराधिकारी नसल्यामुळे ती विकण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर टाटा समूहासोबत डीलही झाली होती. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांची मुलगी जयंती चौहानला व्यवसायात रस नाही. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, बिस्लेरीचे देशभरात 122 पेक्षा जास्त ऑपरेशनल प्लांट आहेत, तर भारतभरात सुमारे 5,000 ट्रक्ससह 4,500 हून अधिक वितरक नेटवर्क आहे.
6 / 6
रमेश चौहान यांची पहिली पसंती मुलगी रमेश चौहान यांना बिसलरीची जबाबदारी त्यांची एकुलती एक मुलगी जयंतीकडे सोपवायची होती. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, जयंतीच्या अनिच्छेमुळे कंपनीची जबाबदारी सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. बिस्लेरी चालवण्याची जबाबदारी कोणी घ्यायची यावरुन रमेश चौहान आणि जयंती चौहान यांच्यात मतभेद असल्याची माहिती आहे.
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूक