शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bisleri: ४ लाखांत सुरुवात, आज २०,००० कोटींची उलाढाल, 'बिस्लेरी'च्या जन्माची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 3:38 PM

1 / 12
टाटा समूह (Tata Group) सातत्याने आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. याअंतर्गत टाटाने अनेक कंपन्यांना खरेदी केले आहे. यातच आता टाटा आणखी एका मोठ्या कंपनीला विकत घेत आहे.
2 / 12
टाटा समूह लवकरच भारतात बाटलीबंद पाणी विकणारी दिग्गज कंपनी बिस्लेरी(Bisleri) खरेदी करणार आहे. यासाठी त्या कंपनीसोबत कराराची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. अंदाजे 6,000 ते 7,000 कोटी रुपयांमध्ये हा करार होऊ शकतो.
3 / 12
बिसलेरीच्या इतिहासावर नजर टाकल्यास ही मूळ एक इतालवी म्हणजे इटलीची (Italy) कंपनी आहे, जी सुरुवातीपासून पाणी विकत होती. बिस्लेरी एक फार्मास्युटिकल कंपनी होती.
4 / 12
जी मलेरिया (Maleria) चे औषधे विक्री करत. या कंपनीचे संस्थापक इटलीचे उद्योगपती Felice Bisleri थे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे फॅमिली डॉक्टर रॉसी यांनी बिसलेरीचा उद्योग पुढे नेला.
5 / 12
बिस्लेरीला भारतात आणण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. दरम्यान, फेलिस यांनी बिस्लेरी नावाने पानी विकण्याचा प्लॅन बनवला होता. डॉक्टर रॉसी यांनी भारतातील त्यांच्या ओळखीच्या खुशरू संतकू नामक वकीलासोबत एकत्र येत बिस्लेरी पाणी उद्योग सुरू केला.
6 / 12
भारतात १९६० च्या दशकात बिस्लेरीची एंट्री झाली, त्यावेळी, पॅकेज्ड वॉटर विकण्याबाबतचा विचार करणंही वेडेपणा होता. कारण, त्यावेळी, लोकांना वाटत की, पाणी विकत कोण घेणार?. मात्र, रॉसी यांनी 1965 मध्ये Mumbai तील ठाण्यात पहिला बिस्लेरीचा प्लँट सुरू केला.
7 / 12
ज्यावेळी बिस्लेरीचा वॉटर प्लांट' स्थापन करण्यात आला. त्यावेळी, मुंबईत काचेच्या बाटल्यांमध्ये पाणी देण्यात येत होते. त्यांस बिस्लेरी बब्ली आणि बिस्लेरी स्टील च्या नावाने बाजारात उतरवण्यात आले होते.
8 / 12
१९६९ मध्ये पारले कंपनीने बिस्लेरी इंडियाची खरेदी केली. त्यानंतर, बिस्लेरी ब्रँड नावानेच काचेच्या बाटलीत पाणी विकायला सुरुवात केली. पाणी विकण्याचा हा उद्योग वाढल्यानंतर प्लास्टीकच्या बाटल्यांची संकल्पना समोर आली आणि तशी सुरुवात झाली.
9 / 12
१९९५ मध्ये रमेश चौहान यांनी बिस्लेरीला पुढे नेण्याची जबाबदारी स्विकारली. मीडिया रिपोर्टनुसार केवळ ४ लाख रुपयात पारले कंपनीने बिस्लेरीची खरेदी केली होती. त्यावेळी, केवळ ५ स्टोअर्स होते.
10 / 12
त्याच बिस्लेरी या पॅकेज्ड वॉटर बोटलचे बाजारात २० हजार कोटी रुपयांपेक्षा मोठी उलाढाल आहे. त्यामध्ये, ६० टक्के भागिदारी असंघटीत आहे. आज देशात बिस्लेरीचे १२२ पेक्षा अधिक प्लँट आहेत. ५ हजार ट्रक आणि ४५०० पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.
11 / 12
बिस्लेरी बॉटल सध्या ८ पॅकेजिंगमध्ये उपलब्ध असून 250ML, 500ML, 1Liter, 1.5liter, 2Liter, 5liter आणि 20Liter च्या बाटल्या असतात. पॅकेज्ड वाटरच्या संघटीत बाजारात बिसलेरीचा समभाग 32 टक्के आहे.
12 / 12
रिपोर्टनुसार, उद्योगपती रमेश चौहान आता 82 वर्षांचे आहेत आणि अलीकडच्या काळात त्यांची प्रकृतीही ठीक नसते. तसेच, बिस्लेरीला विस्ताराच्या पुढील स्तरावर नेण्यासाठी त्यांच्याकडे उत्तराधिकारी नाही. त्यांची मुलगी जयंती व्यवसायात फारशी उत्सुक नाही. हेच मोठे कारण आहे, ज्यामुळे ते टाटा समूहासोबत बिस्लेरीचा करार करत आहेत.
टॅग्स :WaterपाणीthaneठाणेMumbaiमुंबईItalyइटली