A blow to the common man ... CNG will become more expensive due to increase in natural gas prices?
सर्वसामान्यांना फटका... नैसर्गिक गॅसच्या किंमती वाढल्याने CNG ही महागणार? By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 1:36 PM1 / 8ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी महागाईचा झटका दिला आहे. कंपन्यांनी कमर्शियल एलपीजी सिलिंडरची किंमत 43.5 रुपयांनी वाढविली आहे. 2 / 8त्यामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे आदी ठिकाणी अन्न महाग होऊ शकते. याशिवाय खते आणि सीएनजी गॅसच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. त्यामुळेच, सीएनजी वापरकर्त्यांना महागाईचा फटका बसेल. 3 / 8इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, आता दिल्लीत 19 किलोचे कमर्शियल सिलेंडर 1736.5 रुपयांना झाले आहे. पूर्वी ते 1693 रुपयांना होते. 4 / 8 घरगुती वापरासाठी 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत न बदलल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, या निर्णयाचा परिणाम वाहतूकीवर होणार आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांनाही याचा फटका बसणार आहे. 5 / 8कोलकात्यात 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत 1805.5 रुपये एवढी झाली आहे. पूर्वी ही किंमत 1770.5 रुपये एवढी होती. 6 / 8महत्वाचे म्हणजे, पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेत असतात. तर, CNGच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. 7 / 8तत्पूर्वी, गुरुवारी सायंकाळी सरकारने नैसर्गिक गॅसच्या किंमतीत 62 टक्के वाढ जाहीर केली आहे. 8 / 8नैसर्गिक वायूचा वापर खत, वीज निर्मिती आणि सीएनजी गॅस तयार करण्यासाठी केला जातो. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications