शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paytm नं LPG सिलिंडर बुक करा, 2,700 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवा; जाणून घ्या, कसा घ्यायचा ऑफरचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 4:46 PM

1 / 7
Paytm वरून LPG सिलिंडर बुक करणाऱ्यांसाठी कंपनीने एक ऑफर जाहीर केली आहे. Paytm वरून LPG सिलिंडर बुक केल्यास आपल्याला 2,700 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. यासाठी पेटीएमने 3 पे 2700 कॅशबॅक ऑफर आणली आहे. ही ऑफर केवळ नव्या ग्राहकांसाठीच वैध आहे. (Book LPG cylinder with Paytm, get cashback up to Rs 2,700)
2 / 7
Paytm च्या या ऑफरमध्ये पहिल्या तीन महिन्यांसाठी दरमहा 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाईल. एवढेच नाही, तर जुने ग्राहक प्रत्येक बुकिंगवर 5000 रुपयांपर्यंतच्या कॅशबॅकसाठीही पात्र होतात, असेही कंपनीने म्हटले आहे. पेटीएमची 3 पे 2700 कॅशबॅक ऑफर 3 प्रमुख एलपीजी कंपन्या, Indane, HP Gas आणि Bharat Gas साठी आहे.
3 / 7
पेटीएम कॅशबॅक शिवाय, युझर्स 'त्या' वेळी पैसे भरू शकत नसतील, तर ते नंतरही पे करण्याची परवानगी देईल. यासाठी त्यांच्याकडे पुढील महिन्यात सिलिंडरसाठी पैसे देण्याचा पर्याय असेल. यासाठी त्यांना Paytm Now Pay Later (Paytm Postpaid) प्लॅनमध्ये नोंदणी करावी लागेल.
4 / 7
या नव्या ऑफरसंदर्भात बोलताना पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, आम्हाला युटिलिटी पेमेंट अत्यंत सोपे करायचे आहे. या माध्यमाने, संपूर्ण देश पूर्णपणे डिजिटल करायची आमची इच्छा आहे. युझर्स या प्लॅटफॉर्मवरून एलपीजी सिलिंडर बुक करून रिवॉर्ड्सदेखील मिळवू शकतात.
5 / 7
पेटीएमवरून गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी, युझर्सना अॅप ओपन करून Book Gas Cylinder ऑप्शनवर जावे लागेल. यानंतर येथे त्यांना गॅस प्रोव्हायडर निवडावा लागेल. यानंतर मोबाईल नंबर, एलपीजी आयडी किंवा कंझुमर नंबर टाकावा लागेल.
6 / 7
आवश्यक माहिती भरल्यानंतर, युझर्सना पेमेंट करावे लागते. यासाठी ते Paytm Wallet, Paytm UPI, कार्ड अथवा नेटबँकिंगचा वापर करू शकतात. एवढेच नाही, तर युझर्स गॅस सिलिंडरची डिलिव्हरीही ट्रॅक करू शकतात. पेटीएमने गॅस बुकिंगची सुविधा गेल्या वर्षी लॉन्च केली होती.
7 / 7
आवश्यक माहिती भरल्यानंतर, युझर्सना पेमेंट करावे लागते. यासाठी ते Paytm Wallet, Paytm UPI, कार्ड अथवा नेटबँकिंगचा वापर करू शकतात. एवढेच नाही, तर युझर्स गॅस सिलिंडरची डिलिव्हरीही ट्रॅक करू शकतात. पेटीएमने गॅस बुकिंगची सुविधा गेल्या वर्षी लॉन्च केली होती.
टॅग्स :Paytmपे-टीएमonlineऑनलाइनCylinderगॅस सिलेंडर