शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata PUNCH झीरो प्रोसेसिंग फी, कमी व्याजदरात खरेदी करण्याची सुवर्ण संधी; 'ही' बँक देतेय ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 12:05 PM

1 / 12
Tata Punch Offer : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of india) तुमचं कार विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे. स्टेट बँक ग्राहकांना टाटा मोटर्सनं (TATA Motors) नुकत्याच लाँच केलेल्या सब-कॉम्पॅक्ट एसयुव्ही टाटा पंचवर (Tata PUNCH) विशेष ऑफर देत आहे.
2 / 12
यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही. याशिवाय लोनच्या व्याजदरातही सूट देण्यात येणार आहे. एसबीआयनं ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
3 / 12
टाटा पंचसाठी ग्राहकांना कार लोन योनो एसबीआय (YONO sbi) द्वारे अर्ज करावं लागणार आहे. या ऑफर अंतर्गत इन्स्टन्ट इन प्रिन्सिपल लोन अप्रुव्हलही मिळणार आहे.
4 / 12
योनो एसबीआयद्वारे Tata PUNCH साठी लोनचा अर्ज केल्यास कार लोनच्या व्याजदरावर ०.५० टक्क्यांची सूट देण्यात येईल. याशिवाय ग्राहकांना झीरो प्रोसेसिंग फी चा फायदाही मिळणार आहे. टाटा पंच एसयुव्हीची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत ५.४९ लाख रूपये इतकी आहे. याच्या टॉप व्हेरिअंटची किंमत ८.७९ लाख रूपये इतकी आहे.
5 / 12
ज्या ग्राहकांना ही कार खरेदी करायची आहे आणि त्यांना या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नियम आणि अटी पाहाव्या असं आवाहन स्टेट बँकेनं केलं आहे.
6 / 12
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपल्या एसबीआय योनो अॅपमध्ये लॉग इन करावं लागेल. त्यानंतर शॉप अँड ऑर्डर सेक्शनमध्ये नेव्हिगेट करा.त्यानंतर ऑटोमोबाइल सेगमेंटमध्ये जा.
7 / 12
कोणताही भारतीय नागरिक या कार लोनसाठी अर्ज करू शकतो. यासाठी ग्राहकांना पॅन कार्ड देणं आवश्यक आहे. तसंच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचा पगार वार्षिक किमान ३ लाख रूपये असणं आवश्यक आहे.
8 / 12
एसबीआयचं कार लोनसाठी व्याजदर ७.२५ टक्क्यांपासून सुरू होऊन ७.९५टक्क्यांपर्यंत आहे. ३१ जानेवारी २०२२ पर्यंत बँकेनं यावर प्रोसेसिंग फी शून्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
9 / 12
टाटा पंचमध्ये एबीएस सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोलची सुविधा असणार आहे. याशिवाय टाटा पंचमध्ये दोन एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. इंजिनमध्ये Ram-Air Technology चा वापर केला आहे. यामुळे कार टॉप स्पीडवर खूप चांगलं मायलेज देऊ शकेल.
10 / 12
टाटा पंचमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. कार ०-६० किमीपर्यंतचा स्पीड अवघ्या ६.५ सेकंदात गाठते. तर १०० किमी प्रतितास इतका वेग अवघ्या १६.५ सेकंदात गाठेल. ७ इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलं आहे.
11 / 12
मायक्रो एसयूव्हीला १६ इंचाचे टायर्स आणि तब्बल १८७ एमएम ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे. तर कारचे चारही दरवाचे ९० अंशापर्यंत उघडणारे असणार आहेत. जेणेकरुन कारमध्ये सहजपणे प्रवेश करता येईल.
12 / 12
टाटा पंचची सर्वात महत्त्वाची बाब अशी की, ग्लोबल एजंसी एनकॅपमध्ये टाटा पंच कारला सुरक्षेच्या बाबतीत फाइव्ह स्टार रेटिंग मिळालं आहे. एडल्ट सेफ्टीवर टाटा पंचला १७ पैकी १६.४५ गुण मिळाले आहेत. तर चाइल्ड ऑक्यूमेंट सेफ्टीच्या बाबतीत ४९ पैकी ४०.८९ गुण मिळाले आहेत.
टॅग्स :TataटाटाState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया