शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Train Ticket Booking Apps : रेल्वेचे कन्फर्म तिकीट बुक करण्याचं टेंशन गेलं; 'या' अ‍ॅप्सद्वारे स्वस्तात होईल बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 3:12 PM

1 / 5
भारतीय रेल्वेने दररोज मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. सुरक्षित, वेगवान आणि स्वस्त दरात असल्याने रेल्वेला नेहमीच तुडूंब गर्दी पाहायला मिळते. जर तुम्हाला रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला आधीच तिकीट बुक करावे लागते. बहुतेक लोक रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी IRCTC वेबसाइट वापरतात. परंतु, IRCTC व्यतिरिक्त, अशी अनेक अ‍ॅप्स आहेत जिथून तुम्ही ट्रेन तिकीट बुक करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा ॲप्सबद्दल सांगणार आहोत.
2 / 5
IRCTC Rail Connect हे भारतीय रेल्वेचे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचा वापर करून तुम्ही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. यामध्ये तुम्ही तात्काळ बुकिंग, सीट सिलेक्शन, कन्फर्मेशन स्टेटस चेक, ट्रेन शेड्यूल आणि पीएनआर स्टेटस अशा अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता.
3 / 5
ConfirmTkt या अ‍ॅपमघ्ये तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट सहजपणे बुक करू शकता. या अ‍ॅपद्वारे तिकीट बुक केल्यास तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वाढते.
4 / 5
MakeMyTrip हे अ‍ॅप खूप लोकप्रिय अ‍ॅप आहे. या अ‍ॅपपद्वारेही तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट सहज बुक करू शकता. रेल्वे तिकीटाशिवाय या अ‍ॅपद्वारे तुम्ही बस, हॉटेल बुकिंग, फ्लाइट तिकीटही बुक करू शकता.
5 / 5
रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी गोईबीबो अ‍ॅप देखील एक उत्तम पर्याय आहे. या अ‍ॅपद्वारे रेल्वे तिकीट बुक केल्यास, तुम्हाला अनेक ऑफर देखील मिळतील, ज्यामुळे तुमचे तिकीट बुकिंग स्वस्त होते.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेticketतिकिटIRCTCआयआरसीटीसी