शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान
  • महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
  • एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
  • बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा
  • पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान.
  • गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान
  • केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
  • Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
  • झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
  • दुपारी दीड वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 32 टक्के मतदान
  • लातूर जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३३.२७% मतदान
  • महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी एकूण २९.४४% मतदान झालेले आहे
  • सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
  • PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
  • रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाला उत्साही सुरुवात, ११ वाजेपर्यंत २२.९३ टक्के मतदान
  • कोल्हापुरातील शिरोलीत भगवी टोपी घालण्यावरुन हिंदूत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात वाद
  • हर्षवर्धन पाटील यांनी बावडा येथे सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
  • भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएम इति पांडेय यांनी भुसावळ येथील डी.एस. हायस्कूल केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • आमदार राजू कारेमोरे त्यांच्या पत्नी रंजिता कारेमोरे व मुलगी वैभवी व वैभव सहकुटुंब त्यांची मूळ गाव एकलारी येथील मतदान केंद्रावर मतदान करताना.
  • ठाणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १६.६३ टक्के मतदान
  • केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्नी मोनिका आणि कन्या सिद्धी यांच्यासमवेत कोथरूड येथील एमआयटी स्कुलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
  • १०३ वय वर्ष असणारे स्वातंत्र्यसैनिक जी.जी. पारिख यांनी मलबार हिल मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला.
  • मुलुंड म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या प्रणव पालवे (२१) या तरुणाने दोन्ही डोळ्यांनी दिसत नसतानाही पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला.
  • ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला.
  • अकोला जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.३४ टक्के मतदान!
  • विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
  • सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते अकरा या वेळेत 15.66% मतदान झालेले आहे.
  • दुसऱ्या सत्रात नाशिकमध्ये वाढला मतदानाचा टक्का
  • ठाणे - येणारे सरकार पूर्णपणे महायुतीचं, बहुमताचं असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मतदानानंतर प्रतिक्रिया.
  • नाशिक : जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८.८२ टक्के मतदान. शहरात सर्वाधिक मध्य मतदारसंघात १८.४२टक्के मतदान. जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात २६.४१टक्के तर मालेगाव मध्यमध्ये २२.७६ टक्के मतदान.
  • रायगड जिल्हा ७ विधानसभा मतदारसंघ सकाळी ७ ते ११ या कालावधीत २०.४०% मतदान
  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२२ टक्के मतदान झाले.
  • सकाळच्या दोन तासांत नाशिक शहरात सरासरी ६ टक्के मतदान
  • अकोल्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी मतदान केंद्राची पाहणी करीत, मतदान प्रक्रियेची माहिती घेतली. ज्येष्ठ मतदारांशी संवाद साधला!
  • वर्सोवा विधानसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज सकाळी चार बंगला येथील ग्यान केंद्र शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
  • नितीन गडकरी यांनी सहपरिवारासोबत टाऊन हॉल महाल येथे मतदानाचा हक्क बजावला.
  • जळगाव : पळासखेड ता. भडगाव येथे सकाळी १०.३० वाजेपर्यंत १८००पैकी ३०जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
  • पोलीस आयुक्त मुंबई विवेक फणसळकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले व गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा अधिकार.
  • विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
  • राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
  • नांदेड: रवी नगर भागात एक तासापासून ईव्हीएम बंद आहे, मतदार प्रतीक्षेत, दोन मशीनमध्ये झाला बिघाड, १८२ मतदान केंद्र क्रमांक
  • सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ; बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू

Paytm ला आणखी एक धक्का! शेअर पडझडीची BSE ने घेतली दखल; दिले महत्त्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 4:25 PM

1 / 10
आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठे चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. रशिया-युक्रेन युद्धापासून ते इंधनदरवाढ, महागाईचा परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहे.
2 / 10
यातच उत्सुकता आणि बहुचर्चित कंपन्यांचे IPO सुपरफ्लॉप झालेल्यांमध्ये एक नाव आघाडीवर आहे ते Paytm कंपनीचे. शेअर मार्केटमध्ये लिस्टेट झाल्यापासून पेटीएम कंपनीचे शेअर सातत्याने घसरतानाच दिसत आहेत. याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसत आहे.
3 / 10
भांडवली बाजारातील पदार्पणापासून गुंतवणूकदारांना होरपळून काढणाऱ्या पेटीएमच्या शेअरची अखेर शेअर बाजाराने (बीएसई) दखल घेतली आहे. मुंबई शेअर बाजाराने पेटीएम कंपनी व्यवस्थापनाला शेअरमधील घसरणीचे कारण स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
4 / 10
Paytm ने शेअर बाजाराच्या निर्देशांना तत्काळ प्रतिसाद दिला आहे. पेटीएमच्या 'वन ९७ कम्युनिकेशन'च्या शेअरमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. आयपीओवेळी 'वन ९७ कम्युनिकेशन'ची प्रती शेअर २१५० रुपये इतकी किंमत निश्चित करण्यात आली होती.
5 / 10
Paytm चा शेअर पदार्पणाच्या दिवशी तब्बल १९ टक्के गडगडला होता. या घसरणीतून तो अद्याप सावलेला नाही. चार महिन्यात या शेअरचे मूल्य ७४.७२ टक्क्यांनी कमी झाले आहे. या घसरणीची गंभीर दखल मुंबई शेअर बाजाराने घेतली आहे.
6 / 10
Paytm कंपनीला २२ मार्च २०२२ रोजी बीएसईने पत्र पाठवले असून त्यात घसरणीची कारणे स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. या पत्रावर तत्काळ पेटीएमकडून प्रतिसाद देण्यात आला आहे.
7 / 10
Paytm कंपनीची पाळेमुळे भक्कम आहेत. कंपनी भविष्यात वृद्धीच्या अपेक्षा व्यक्त करते असा दावा पेटीएमने केला आहे. कंपनी शेअरबाबत वेळोवेळी शेअर बाजाराला माहिती देईल, अशी ग्वाही पेटीएमने दिली आहे.
8 / 10
नुकताच रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली होती. पेटीएम पेमेंट बँकेचा आयटी लेखा परीक्षण अहवाल तपासल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यासाठी आयटी ऑडिट कंपनीची तातडीने नियुक्ती करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले होते.
9 / 10
नोव्हेंबर महिन्यात पेटीएमच्या वन ९७ कम्युनिकेशन्सने शेअर बाजारात आयपीओ आणला होता. कंपनीने समभाग विक्रीतून १८३०० कोटींचे भांडवस उभारले होते. आयपीओसाठी प्रती शेअर २१३० रुपये भाव ठेवण्यात आला होता.
10 / 10
मात्र प्रत्यक्षात शेअर नोंदणीवेळी तो १९ टक्के गडगडला. त्यानंतर मागील चार महिन्यात त्यात प्रचंड घसरण झाली आहे. पेटीएमचे आयपीओवेळी १.५ लाख कोटींचे बाजार भांडवल होते ते आता ४४००० कोटी इतके खाली आले आहे.
टॅग्स :Paytmपे-टीएमshare marketशेअर बाजार