शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महिनाभर चालणार ४९ रूपयांचा प्रीपेड प्लॅन; डेटासोबत कॉलिंगही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 4:02 PM

1 / 10
सध्या देशात असलेल्या दूरसंचार कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, तसंच ग्राहकांना आपल्याकडे बांधून ठेवण्यासाठी कंपन्या अनेक नवनव्या ऑफर्स घेऊन येत आहेत. रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-idea) या कंपन्या जबरदस्त ऑफर्स देत आहे.
2 / 10
सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल (BSNL) खासगी कंपन्यांना जबरदस्त टक्कर देत आहे. अन्य कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलही अनेक जबरदस्त ऑफर देत आहे.
3 / 10
सध्या आम्ही एक प्रीपेड प्लॅनबद्दल तुम्हाला सांगत आहोत ज्याची किंमत ५० रूपये आहे. यामध्ये डेटासह कॉलिंगचीही सुविधा मिळत आहे.
4 / 10
ज्या प्लॅनबद्दल सांगत आहोत त्याची किंमत ४९ रुपये इतकी आहे. यामध्ये ग्राहकांना डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळत आहे. त्याची वैधता २८ दिवसांची आहे.
5 / 10
या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना कॉलिंगसाठी १०० मिनिटं देत आहे. याचा वापर कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगसाठी करता येणार आहे.
6 / 10
यासोबत कंपनी एकूण २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसही देणार आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये अन्य कोणतीही सुविधा देण्यात येत नाही.
7 / 10
जर तुम्ही रिलायन्स जिओचा अशाप्रकारचा प्लॅन पाहत असाल तर तुम्हाला १२९ रूपयांचा खर्च करावा लागणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळतेय यामध्ये बीएसएनएलप्रमाणेच २ जीबी डेटा आणि एकूण ३०० एसएमएस देण्यात येतात.
8 / 10
यामध्ये मोफत मिनिटांऐवजी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना मोफत अॅप्सचं सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे.
9 / 10
जिओप्रमाणेच व्होडाफोन आयडियामध्येही तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता देण्यात येते. तसंच २ जीबी डेटाही देण्यात येत आहे.
10 / 10
यामध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस देण्यात येतात. याशिवाय Movies & TV Basic चं मोफत अॅक्सेसही देण्यात येणार आहे.
टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाSmartphoneस्मार्टफोन