शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BSNL नं लाँच केले चार बजेट प्लॅन्स; अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार अनेक बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 4:47 PM

1 / 6
नवीन वर्षाच्या सुरुवातीला बीएसएनएलने (BSNL Prepaid Plans) आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन आणि स्वस्त प्लॅन आणले आहेत. कंपनीने चार नवीन बजेट प्रीपेड प्लॅन लाँच केले असून त्यापैकी तीन प्लॅन 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे आहेत.
2 / 6
याशिवाय कंपनीनं आणखी एक 347 रुपयांचा प्लॅनही लाँच केला आहे आहे. 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे तर तर 347 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 दिवसांची वैधता मिळते.
3 / 6
या सर्व प्लॅन्समध्ये 184 रुपयांचा प्लॅन हा सर्वात परवडणारा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1GB डेटा देण्यात येतो. यासोबतच 100 एसएमएस आणि फ्री व्हॉईस कॉलिंगचा लाभही 28 दिवसांसाठी मिळणार आहे.
4 / 6
याच सुविधा BSNL च्या 185 रुपये आणि 186 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील उपलब्ध आहेत. म्हणजेच, हे दोन्ही प्लॅन 28 दिवसांची वैधता, दररोज 1GB डेटा, 100 SMS आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसहदेखील येतात.
5 / 6
हायस्पीड डेटा संपल्यानंतर ग्राहकांना 80kbps चा स्पीड मिळतो. परंतु या तिन्ही प्लॅन्समध्ये काही फरकही आहे. 184 रुपयांचा प्लॅन Lystn पॉडकास्टसह येतो. तर 185 रुपयांच्या प्लॅनमध्ये बीएसएनएल ट्यून आणि ऑनमोबाईल ग्लोबल लिमिटेडकडून PWA वर एरिना मोबाईल गेमिंग सर्व्हिसेसचं चॅलेंज बंडल मिळतं. तर 186 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना Hardy Games चं बेनिफिट आणि बीएसएनएल ट्युनचं सबस्क्रिप्शन मिळतं.
6 / 6
बीएसएनएलच्या 347 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा, 100 एसएमएस आणि अनलिमिटेड वॉईस कॉलिंगचा लाभ मिळतो. या प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे. यामध्ये ऑनमोबाईल ग्लोबल लिमिटेडकडून PWA वर एरिना मोबाईल गेमिंग सर्व्हिसेसचं चॅलेंज बंडल मिळतं. या प्लॅनमध्ये एकूण 112 GB डेटा मिळतो.
टॅग्स :BSNLबीएसएनएलIndiaभारत