शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Disney+ Hotstar च्या बेनिफिटसह 300 Mbps स्पीड, 4000GB डेटा आणि अन्य फायदे देतेय 'ही' कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 9:25 PM

1 / 9
ग्राहकांना निरनिराळे प्लॅन देण्यात बीएसएनएल (BSNL) ही सरकारी कंपनी इतर खासगी कंपन्यांच्या मागे नाही. कंपनीकडे कमी किमतीची असा एक खास प्लॅन आहे, ज्यामध्ये Disney + Hotstar Premium चा लाभ मिळतो.
2 / 9
बीएसएनएल ही कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक उत्तमोत्तम ब्रॉडबँड प्लॅन्स ऑफर करत आहे. यापूर्वी कंपनीकडे दोन हाय-एंड प्लॅन्स होते, ज्यामध्ये Disney + Hotstar प्रीमियमचा लाभ उपलब्ध होता.
3 / 9
नंतर कंपनीने 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये काही बदल केले. परंतु आता कंपनीचा एकमेव ब्रॉडबँड प्लॅन जो डिस्ने प्लस हॉटस्टार प्रीमियम बेनिफिटसह येतो. चला जाणून घेऊया या प्लॅनची ​​किंमत किती आहे आणि त्यात काय खास आहे.
4 / 9
BSNL सध्या फक्त 1499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनसह Disney+ Hotstar प्रीमियमचा लाभ देत आहे. या प्लॅनमध्ये पूर्वीही OTT बेनिफिट उपलब्ध होते आणि त्याच्या फायद्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, नवीन युझर्सना पहिल्या महिन्याच्या बिलावर मोठी सूट मिळते.
5 / 9
1499 रुपयांचा प्लॅन डाउनलोड आणि अपलोड दोन्हीसाठी 300 Mbps स्पीडसह येतो. या ब्रॉडबँड प्लॅनसह, युझर्सना 4000GB डेटा मिळतो. याशिवाय यूजर्सना फ्री फिक्स्ड लाइन व्हॉईस कॉलिंग कनेक्शन देखील मिळते.
6 / 9
वर नमूद केल्याप्रमाणे, या प्लॅनवरील नवीन ग्राहकांना 500 रुपयांपर्यंतच्या पहिल्या बिलावर 90 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. FUP डेटा वापरल्यानंतर इंटरनेटचा वेग 4 Mbps पर्यंत कमी केला जातो. BSNL ने 1499 रुपयांच्या प्लॅनला फायबर अल्ट्रा प्लॅन म्हटले आहे.
7 / 9
दरम्यान, या किंमतीत इतर कंपन्यांकडे Disney+ Hotstar Premium चा मोफत लाभ देणारा कोणतीही ब्रॉडबँड प्लॅन नाही.
8 / 9
JioFiber आणि Airtel Xstream Fiber सारख्या कंपन्या Disney+ Hotstar चे फायदे देतात, परंतु हे प्रीमियम सबस्क्रिप्शन नाही. त्यामुळे जर तुम्ही या विशेष OTT लाभासह ब्रॉडबँड प्लॅन शोधत असाल, तर तो तुम्हाला BSNL भारत फायबर प्लॅनमध्ये मिळू शकते.
9 / 9
BSNL भारत फायबरद्वारे 749 रुपये आणि 999 रुपयांमध्येही OTT प्लॅन ऑफर केले जातात. या दोन्ही प्लॅन्समध्ये ग्राहकांना भरपूर OTT बेनिफिट्स मिळतात. परंतु Disney + Hotstar Premium सबस्क्रिप्शन उपलब्ध नाही. 1499 रुपयांच्या समान किमतीसाठी, JioFiber अनेक OTT बेनिफिट्ससह 300 Mbps चा प्लॅन ऑफर करते.
टॅग्स :BSNLबीएसएनएलReliance Jioरिलायन्स जिओ