शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BSNL चा वर्क फ्रॉम होमसाठी खास प्लान; 4TB पर्यंत डेटा, सुपरफास्ट इंटरनेट स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 9:27 PM

1 / 15
टेलिकॉम कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र होत चालली असताना ब्रॉडबँड सेक्टरमध्येही खासगी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वैविध्यपूर्ण प्लान आणत आहेत.
2 / 15
कोरोनाच्या फैलावानंतर वर्क फ्रॉम होम (Work From Home) मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अद्यापही वर्क फ्रॉम होम सुरू असल्याचे पाहायला मिळते.
3 / 15
सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने आपल्या युजर्ससाठी धमाकेदार ब्रॉडबँड प्लान आणला आहे. (bsnl introduced bharat fibre broadband plans for work from home)
4 / 15
BSNL ने इंटरनेट ब्रॉडबँड प्लान्स लाँच केले आहेत. या प्लानची सुरुवात ४५० रुपयांपेक्षा कमी आहे. ग्राहकांकडून ब्रॉडबँड कनेक्शनची मागणी वाढल्याने BSNL ने Bharat Fibre प्लान्स बाजारात आणले.
5 / 15
BSNL ने गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये आपले खास Bharat Fibre प्लान्स लाँच केले होते. Airtel आणि Jio या कंपन्यांपेक्षा BSNL च्या ऑफरमध्ये अर्ध्या किमतीत जास्त डेटा आणि अधिक वैधता मिळत आहे.
6 / 15
BSNL च्या Bharat Fibre ब्रॉडबँडचा सर्वात स्वस्त प्लान ४४९ रुपयांचा आहे. यामध्ये 30Mbps च्या स्पीडने जवळपास ३.३ टीबी पर्यंत डेटा ऑफर केला जात आहे.
7 / 15
BSNL च्या ४४९ रुपयांच्या प्लानसह लँडलाइन फोन कनेक्शन सुद्धा दिले जाते. प्लान अंतर्गत कोणत्याही नेटवर्कमध्ये अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते.
8 / 15
BSNL ने सुपरफास्ट इंटरनेटसाठी विशेष प्लान आणले आहेत. Bharat Fibre 799 मध्ये ग्राहकांना 100Mbps ची स्पीड मिळते. या प्लानमध्ये एकूण ३.३ टीबी डेटा दिला जातो. तसेच ग्राहकांना यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते.
9 / 15
BSNL Bharat Fibre 999 रुपयांच्या प्लानमध्ये युझर्सना 200Mbps चा स्पीड दिला जातो. तसेच ३.३ टीबी पर्यंत डेटा, अनलिमिटेड कॉलिंग शिवाय Disney+ Hotstar ची फ्री मेंबरशिप दिली जाते.
10 / 15
BSNL च्या ब्रॉडबँडमध्ये सर्वाधिक किमतीचा प्लान १४९९ रुपयांचा आहे. यामध्ये युजर्सना 300Mbps चा स्पीड, ४ टीबी डेटा मिळतो. तसेच Disney+ Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.
11 / 15
तसेच BSNL च्या ४४९ रुपये किंमतीत युझर्स इंटरनेटची मजा घेऊ शकतात. BSNL च्या या प्लानमध्ये ९० दिवसांची वैधता असून, अन्य कंपन्या केवळ एका महिन्याची वैधता देतात, असे सांगितले जात आहे.
12 / 15
BSNL च्या या प्लान अंतर्गत ग्राहकाला कनेक्शन घ्यायचे असल्यास कोणतेही इंस्टॉलेशन चार्ज द्यावे लागणार नाही. या सेवा मोफत दिल्या जाणार आहेत.
13 / 15
विशेष म्हणजे युझर्संना यात ३० Mbps ची स्पीड मिळणार असून, BSNL सुरुवातीचे तीन महिने एकूण ३,३०० जीबी डेटा ऑफर करत आहे.
14 / 15
BSNL च्या ब्रॉडबँड कनेक्शनची ही ऑफर केवल तीन महिन्यासाठी आहे. याची वैधता संपल्यानंतर ग्राहकांना महिन्याला ५९९ रुपये द्यावे लागतील.
15 / 15
दरम्यान, BSNL मोबाइलकडूनही अनेक उत्तमोत्तम प्लान ग्राहकांसाठी आणले जात असून, वैधता, कॉलिंग आणि स्पीड यामध्ये अन्य कंपन्यांची चांगली स्पर्धा करताना दिसत आहे.
टॅग्स :BSNLबीएसएनएलInternetइंटरनेट