शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

VIP मोबाईल नंबर हवाय का? BSNL देतंय संधी; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 12:45 PM

1 / 8
बीएसएनएल (Bharat Sanchar Nigam Limited) ग्राहकांना प्रीमियम किंवा व्हीआयपी (VIP) मोबाईल नंबर मिळवण्याची संधी देत ​​आहे. व्हीआयपी मोबाईल नंबर्सचा फायदा असा आहे की, ते स्पेशल कॉम्बिनेशनने (विशेष संयोजन) बनविलेले असतात, ज्यामुळे ते सहजपणे लक्षात ठेवता येतात.
2 / 8
हा ऑप्शन भारतातील प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला असा व्हीआयपी किंवा फॅन्सी नंबर घ्यायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी स्वत: रजिस्टर करून ई-ऑक्शनमध्ये प्रवेश करावा लागेल.
3 / 8
या ई-ऑक्शनमध्ये तुम्ही एकाच ठिकाणी सर्व वेगवेगळे कॉम्बिनेशन पाहू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या कॉम्बिनेशनवर बोली लावू शकता. बीएसएनएलकडून या नंबर्सचा ऑक्शन यासाठी केली जाते की, त्यांची मागणी जास्त असते.
4 / 8
अशा परिस्थितीत, जर तुम्ही स्वतःसाठी प्रीमियम किंवा व्हीआयपी मोबाइल नंबर घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला याबाबत संपूर्ण माहिती सांगत आहोत. यासाठी तुम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या ब्राउझरमध्ये eauction.bsnl.co.in ही साइट ओपन करावी लागेल.
5 / 8
यानंतर तुम्ही टॉप बारवर असलेल्या Login/Register वर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा जुना मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागेल. यानंतर बीएसएनएलकडून लॉगिन डिटेल्स तुमच्या दिलेल्या ईमेल आयडीवर पाठवला जाईल.
6 / 8
बीएसएनएलने पाठवलेल्या या लॉगिन क्रेडेंशियल्सचा वापर करून तुम्ही रजिस्टर प्रोसेस पूर्ण करू शकता. यानंतर, फॅन्सी नंबर्सची लिस्ट पाहिल्यानंतर, तुम्ही त्यातून एक नंबर निवडू शकता. यानंतर, Continue to Cart वर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन फी (रिफंडेबल) भरावी लागेल.
7 / 8
बोली सुरू झाल्यानंतर, तुमची किमान रक्कम भरा. त्यानंतर बीएसएनएल बोलीदार लिस्टमधून प्रत्येक फॅन्सी नंबरसाठी तीन सहभागी निवडेल. उर्वरित सहभागींना 10 दिवसांच्या आत रजिस्ट्रेशन फी परत केली जाईल.
8 / 8
यानंतर निवडलेल्या तीन बोलीदारांचे H1, H2 आणि H3 असे क्लासिफाइड केले जाईल. सर्वाधिक बोली लावणाऱ्याला पहिली संधी दिली जाईल. त्याने नंबर न घेतल्यास आणखी एक संधी दिली जाईल. दरम्यान, तुम्हाला तुमच्या आवडीचा नंबर मिळाल्यानंतर तो काही दिवसांत अॅक्टिव्ह होईल.
टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल