शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' कंपनीचे प्लॅन्स दिग्गज कंपन्यांना देणार टक्कर; रोज मिळणार 5GB पर्यंत डेटा आणि अन्य बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 4:12 PM

1 / 9
सरकारी दूरसंचार कंपनी BSNL आपल्या प्रीपेड प्लॅन्ससह रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन आयडिया (Vodafone-Idea) आणि एअरटेल (Airtel) सारख्या दिग्गज कंपन्यांना जबरदस्त स्पर्धा देत आहे. बीएसएनएलचेही असे प्लान आहेत, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 5 जीबीपर्यंत डेटा मिळेल.
2 / 9
आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशाच काही जबरदस्त प्लॅनबद्दल सांगत आहोत. यामध्ये, बंपर डेटा व्यतिरिक्त, तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, मोफत एसएमएस आणि अनेक अतिरिक्त फायदे देखील दिले जात आहेत.
3 / 9
BSNL च्या 185 रुपयांच्या प्लॅनमध्ये (STV_185), तुम्हाला 28 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1 GB डेटा देण्यात येतो. याशिवाय दररोज 100 मोफत एसएमएस ऑफर केले जातात. तसंच यात अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ देण्यात येतो. कंपनीचा 298 रुपयांचा प्लॅन (STV_298) सुद्धा या सारख्याच बेनिफिट्ससह येतो, परंतु त्याची वैधता 56 दिवसांची आहे.
4 / 9
कंपनी 187 रुपयांचा व्हॉईस प्लान ऑफर करत आहे. Voice_187 असे या प्लॅनचे नाव आहे. यामध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा आणि 100 मोफत एसएमएससह 28 दिवसांची वैधता मिळेल. प्लॅनमध्ये, कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंगदेखील देण्यात येत आहे.
5 / 9
कंपनीच्या 347 रुपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात.
6 / 9
कंपनी 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये (STV_299) दररोज 3GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये, कंपनी 30 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग ऑफर करत आहे.
7 / 9
त्याचप्रमाणे, 247 रुपयांच्या STV मध्ये तुम्ही दैनंदिन मर्यादेशिवाय 50 GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस देत देण्यात येतात. प्लॅनमध्ये ग्राहकांना Eros Now आणि BSNL Tune चे सबस्क्रिप्शनही देण्यात येतंय.
8 / 9
BSNL च्या 499 रुपयांच्या स्पेशल टेरिफ व्हाउचरमध्ये, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 2 GB डेटासह 100 मोफत एसएमएस दिले जात आहेत. या प्लॅनची ​​वैधता ९० दिवसांची आहे.
9 / 9
तर दुसरीकडे जर तुम्हाला दररोज 5 जीबी डेटा हवा असेल तर तुम्हाला 599 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करावे लागेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अमर्यादित मोफत नाईट डेटा देखील मिळतो. प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएससह अमर्यादित कॉलिंग देखील दिले जात आहे.
टॅग्स :BSNLबीएसएनएलReliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेल