BSNL Rupees 47 prepaid plan launched on a promotional basis till March here is what it offers
आला सर्वात स्वस्त प्लॅन, केवळ ४७ रूपयांत मिळणार १४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 2:51 PM1 / 10सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलनं सर्वात स्वस्त प्रीपेड मोबाईल प्लॅन लाँच केला आहे. कंपनीनं नुकतानच ४७ रूपयांचा एक नवा फर्स्ट रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. 2 / 10बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये जिओ, एअरटेल, व्होडाफोनच्या तुलनेत अधिक ऑफर्स आणि बेनिफिट्स मिळत आहेत. 3 / 10भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांचा सुरूवातीचा प्लॅन ९७ रूपयांपासून सुरू होतो. तर दुसरीकडे जिओ प्राईम सबस्क्रिप्शनसाठी ९९ रूपये ग्राहकांकडून आकारते. 4 / 10बीएसएनएलच्या या प्लॅनसोबत १४ जीबी हायस्पीड टेडा आणि फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच यासोबत कंपनी मोफत ४जी सिमकार्डही देत आहे.5 / 10ग्राहकांना ३१ मार्च २०२१ पर्यंत या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे. जर कंपनीनं प्रमोशनल ऑफर पुढेही सुरू ठेवली तर ग्राहकांना याचा पुढेही लाभ घेता येईल. 6 / 10परंतु एक महत्त्वाची बाब म्हणजे सध्या हा प्लॅन केवळ चेन्नई आणि तामिळनाडू या दोन सर्कलसाठी उपलब्ध आहे. अन्य सर्कलमध्ये लवकरच हे प्लॅन लाँच केले जातील. 7 / 10४७ रूपयांच्या या प्लॅनसोबत ग्राहकांना १०० दिवसांची इनिशिअल प्लॅन व्हॅलिडिटी देण्यात येते. 8 / 10१०० दिवसांची सिम व्हॅलिडिटी संपल्यानंतर ग्राहकांना सिमकार्ड अॅक्टिव्हेट ठेवण्यासाठी एक रिचार्ज करावं लागतं. 9 / 10या प्लॅनसोबत ग्राहकांना रोमिंग आणि अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिलतो. तंच १४ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसही देण्यात येतात. 10 / 10हा प्लॅन २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह मिळतो. सध्या केवळ ४७ रूपयांचा रिचार्ज करून या कॉम्बो प्लॅनचा लाभ घेता येऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications