BSNL's affordable plan 2 GB data per day Unlimited calling, just Rs 7 per day
BSNL : बीएसएनएलचा परवडणारा प्लान; रोज २ जीबी डेटा ; अनलिमिटेड कॉलिंग, दररोजचा केवळ ७ रुपयांचा खर्च By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 1:41 PM1 / 10काही महिन्यापूर्वीच देशातील टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला फटका बसला आहे. तर दुसरीकडे बीएसएनएल कंपनीने नवीन प्लान लाँच केले आहेत. 2 / 10यामुळे अनेक ग्राहकांनी बीएसएनएलमध्ये सीम पोर्ट करण्यावर भर दिला आहे. स्वस्त रिचार्जसाठी सिम पोर्ट केलेले लाखो युझर्स आहेत. एकीकडे Jio-Airtel सारख्या कंपन्यांचे प्लॅन खूप महाग आहेत, तर दुसरीकडे BSNL आहे जे या दोघांपेक्षा स्वस्त प्लान ऑफर करत आहे.3 / 10जर तुम्ही BSNL चा स्वस्त प्लान शोधत असाल तर तुमच्यासाठी हा नवीन प्लान फायद्याचा आहे. यात 2GB डेटा आणि ७ रुपयांपेक्षा कमी मध्ये अमर्यादित कॉलिंग सारखे फायदे मिळतात.4 / 10सरकारी टेलिकॉम कंपनी १०५ दिवसांच्या वैधतेसाठी परवडणारा प्लान देत आहे. यामध्ये यूजर्सला या दररोज 2GB डेटा मिळतो. यासोबतच 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे.5 / 10यामध्ये एकूण 210 GB डेटा रोलआउट करण्यात आला आहे. त्याची किंमत ६६६ रुपये आहे. याला BSNL चा ‘सिक्सर प्लान’ असेही म्हणतात. कंपनीने हा प्लान पहिल्यांदा २०१७ मध्ये आणला होता.6 / 10Jio आणि Airtel च्या तुलनेत, BSNL चा हा प्लान खूप कमी किमतीत या फायद्यांसह आहे, हा प्लान तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या वैधतेसह उपलब्ध आहे.7 / 10BSNL कंपनीचा १०८ रुपयांचा प्लान देखील आहे, हा प्लान सिम सुरू ठेवण्यासाठी चांगला आहे. यामध्ये दररोज १ जीबी डेटा दिला जातो.8 / 10बीएसएनएल आपल्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर पूर्ण भर देत आहे. कंपनीने पुढील एका वर्षात 5G आणि 4G कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर काम सुरू केला आहे. 9 / 10कंपनीने एक लाख मोबाइल टॉवर्सना 4G सेवेसह सुसज्ज करून पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर भर दिला आहे.10 / 10याशिवाय गेल्या काही महिन्यांत कंपनीच्या ग्राहकांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. तर इतर कंपन्यांचे ग्राहक या काळात कमी झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications