budget 2021 import duty on electronics appliances and other items may be increased up to 10 percent
Budget 2021: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार; 'या' वस्तूंच्या किंमती वाढणार? By मोरेश्वर येरम | Published: January 20, 2021 9:21 PM1 / 10यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि इतर वस्तूंसह एकूण ५० गोष्टींवरील आयात शुल्कात वाढ केली जाण्याची शक्यता आहे.2 / 10आयात शुल्कात वाढ करून स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन देत भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीला चालना देण्याचा केंद्राचा मानस आहे. 3 / 10पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी 'आत्मनिर्भर भारत' या योजनेला डोळ्यासमोर ठेवून आयात शुल्क वाढविलं जाण्याची शक्यता असल्याचं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलं आहे.4 / 10आयात शुल्कात वाढ करुन २०० ते २१० अब्ज रुपयांचा अतिरिक्त महसूल केंद्राला अपेक्षित आहे. 5 / 10कोरोना संकटामुळे देशाच्या तिजोरीला आलेली मरगळ मोडून काढण्यासाठी केंद्राकडून या शुल्कवाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 6 / 10सुत्रांच्या माहितीनुसार, आयात शुल्कातील वाढीमुळे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 7 / 10फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वाहनांसोबतच फ्रीज आणि एसीच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. 8 / 10टेस्ला आणि आयकिया या परदेशी कंपन्यांनी याआधीच भारताच्या आयात शुल्काबाबत चिंता व्यक्त केली होती. 9 / 10गेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून काही वस्तूंच्या आयात शुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे यावेळी नेमकी किती वाढ केली जातेय हे पाहणं महत्वाचं असणार आहे.10 / 10गेल्या वर्षी केंद्राने फुटवेअर, फर्निचर, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह इतर अनेक गोष्टींवर २० टक्क्यांपर्यंत आयात शुल्कात वाढ केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications