Budget 2021: करदात्यांना धक्का! इन्कम टॅक्सच्या बाबतीत सरकार मोठा निर्णय घेणार? By मोरेश्वर येरम | Published: January 21, 2021 9:22 PM
1 / 10 केंद्र सरकारकडून १ फेब्रवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाईल. यावेळीच्या अर्थसंकल्पातून करदात्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. यामागची कारणं जाणून घेऊयात... 2 / 10 अर्थमंत्री निर्मला सितारामण १ फेब्रुवारी २०२१ रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळीच्या अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 3 / 10 केंद्राकडून आयकराच्या (income tax) दरात आणि टॅक्स स्लॅबमध्ये दिल्या जाणाऱ्या सवलतीची सर्वजण वाट पाहात असतात. 4 / 10 पण यावेळीच्या अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. 5 / 10 केंद्र सरकारने जर असं केलं तर देशातील मध्यमवर्गीय कुटुंबियांना धक्का बसू शकतो. 6 / 10 आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी यावेळीच्या अर्थसंकल्पात वैयक्तिक टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 7 / 10 केंद्राकडून टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. तरी इतर पर्यायांच्या माध्यमातून करदात्यांना सवलत देण्यात येऊ शकते. 8 / 10 आयकराच्या कायद्यात ८०-सी अंतर्गत देण्यात येणारी सूट वाढवण्याचा विचार केंद्रीय अर्थमंत्रालयाचा विचार सुरू आहे. पण त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेले नाही. 9 / 10 सध्या सेक्शन ८०-सी अंतर्गत करदात्यांना वैयक्तिक आयकरात १.५० लाखांपर्यंतची सूट दिली जाते. यात वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. 10 / 10 यंदाच्या अर्थसंकल्पात सेक्शन ८०-सी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या १.५० लाखांच्या सवलतीत वाढ करुन ती २ लाख रुपये इतकी केली जाण्याची शक्यता आहे. आणखी वाचा