शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budget 2022 : लहान शेतकऱ्यांवर विशेष लक्ष; राष्ट्रपती म्हणाले, 'सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 1:38 PM

1 / 12
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session)आजपासून सुरू झाले आहे. वर्षाच्या पहिल्या सत्राची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या अभिभाषणाने झाली. राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहांना संबोधित केले. सरकार देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी सतत काम करत आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात सांगितले.
2 / 12
लहान शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला. यावेळी राष्ट्रपती म्हणाले की, लहान शेतकऱ्यांचे (एकूण 80 टक्के) हित सरकारने प्रामुख्याने समोर ठेवले आहे. सरकारही सेंद्रिय शेतीसारखे प्रयत्न करत आहे. तसेच, पावसाचे पाणी वाचवण्यासाठी सरकारही पावले उचलत आहे.
3 / 12
1. अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अभिभाषणात सांगितले की, सरकार ग्रामीण अर्थव्यवस्था आणि देशातील शेतकऱ्यांना सशक्त करण्यासाठी सतत काम करत आहे.
4 / 12
2. देशातील 80 टक्के शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत, ज्यांचे हित माझ्या सरकारने नेहमीच केंद्रस्थानी ठेवले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून 11 कोटीहून अधिक शेतकरी कुटुंबांना 1 लाख 80 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.
5 / 12
3. सरकारने सर्वाधिक धान्यांची खरेदी केली आहे. खरीप धान्य पिकांच्या खरेदीमुळे 1.30 कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 2020-21 या वर्षात निर्यात सुमारे 3 लाख कोटींवर पोहोचली आहे.
6 / 12
4. 2020-21 या वर्षात कृषी निर्यातीत 25 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. ही निर्यात सुमारे 3 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
7 / 12
5. फलोत्पादन- मध उत्पादनाच्या बाबतीत आपण पुढे गेलो. 2015-15 च्या तुलनेत 115% वाढ झाली आहे. कोरोनाच्या काळात सरकारने भाजीपाला, फळे, दूध यासारख्या नाशवंत गोष्टींसाठी रेल्वे सुरू केली.
8 / 12
6. देशातील 80 टक्के शेतकरी हे छोटे शेतकरी आहेत, ज्यांना सरकारने लाभ दिला आहे. देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.
9 / 12
7. देशात सिंचन प्रकल्प आणि नद्या जोडण्याचे कामही पुढे नेण्यात आले आहे. केन-बेतवा प्रकल्पासाठी 150 कोटी रुपयांच्या निधीतून काम सुरू आहे.
10 / 12
8. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार केले जात आहेत. अटल भू-जल योजनेतून 64 लाख हेक्टर सिंचन क्षमता विकसित करण्यात आली आहे.
11 / 12
9. कोरोना महामारी असूनही 2020-21 मध्ये आमच्या शेतकऱ्यांनी 30 कोटी टनपेक्षा अधिक अन्नधान्य आणि 33 कोटी टनपेक्षा अधिक बागायती उत्पादनांचे उत्पादन केले आहे.
12 / 12
10. किसान रेलचा शेतकऱ्यांना फायदा झाला. कोरोना संकट काळात 1900 हून अधिक किसान रेल धावल्या. विचार नवा असेल, तर जुनी संसाधनेही उपयोगी पडू शकतात, हे यातून दिसून येते, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.
टॅग्स :FarmerशेतकरीRamnath Kovindरामनाथ कोविंदBudgetअर्थसंकल्प 2022